shakthipith mahamarg : महायुती शक्तिपीठचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करणार सत्ताधारी खासदार, आमदारांची मुख्यमंत्र्यांबरोबर लवकरच बैठक : महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढाकार घेतला आहे. सांगली व कोल्हापूर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांकडून आराखड्याची नव्याने बांधणी सुरू केली आहे. महामार्गाला गती येण्यासाठी 12 जिल्ह्यातील महायुतीच्या आमदार व खासदारांची बैठक देखील होणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग भूसंपादनाला आलेली स्थगिती आता उठण्याची शक्यता दाट आहे.
shakthipith mahamarg : महायुती शक्तिपीठचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करणार सत्ताधारी खासदार, आमदारांची मुख्यमंत्र्यांबरोबर लवकरच बैठक
शक्तिपीठ महामार्ग हा महायुती सरकारचा सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जातो. 2023 मध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा झाली होती. राज्यातील 12 जिल्ह्यांमधून 802 किमी लांबीचा ग्रीनफिल्ड हायवे नागपूर ते गोव्याला थेट जोडणारा आहे. महामार्गामध्ये राज्यातील 27 हजार हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्याची योजना आहे. यासाठी राज्य सरकार 86 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. सहा पदरी असणारा हा महामार्ग राज्यातील वर्धा, नांदेड, परभणी, धाराशिव, यवतमाळ, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून जाणार आहे.
या महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज तर 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असा प्रस्ताव आहे.
2025 मध्ये या महामार्गाचे भूमिपूजन करून 2030 मध्ये तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचा मानस त्यांचा होता. महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी भूसंपादनची अधिसूचना काढली होती. मात्र याला विरोध झाला. शेतकर्यांची आंदोलने झाली. मोठ्या प्रमारात हरकती दाखल झाल्या. याचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालिन महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गाच्या भूसंपादनाला स्थगिती दिली होती. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्ग करणार असल्याचे जाहीर केले होते.
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्यांचा विरोध आहे.
इतर ठिकाणी शेतकर्यांच्या पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात सांगली व कोल्हापूर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांकडून नव्याने माहिती घेण्याचे काम सुरू झाले आहे. शेतकर्यांच्या जमिनी संपादन करताना कशासाठी विरोध होत आहे. जागेचा योग्य मोबदला दिला तर महामार्गासाठी जागा शेतकरी देणार का? याची प्रत्यक्ष माहिती अधिकार्यांकडून गोळा केली जात आहे. दुष्काळी भागातील अनेक शेतकर्यांनी देखील महामार्गाला पाठिंबा दिला असल्याचे वृत्त आहे.
आमदार सुहास बाबर यांनी देखील दोन दिवसांपूर्वी महामार्गाबाबत विधान केले होते.
सांगली जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी देखील दोन दिवसांपूर्वी महामार्गाबाबत विधान केले होते. शेतकर्यांच्या जमिनींना योग्य भाव दिल्यास महामार्गाला विरोध होणार नाही, असे सरकारचे मत आहे. पण शेतकर्यांना विश्वासात घेऊनच महामार्ग होणार आहे. त्यामुळे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 12 जिल्ह्यातील महायुतीचे आमदार व खासदारांची बैठक घेणार असल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा महत्वकांक्षी हा प्रकल्प आहे. त्यामुळे या महामार्गाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
महामार्गासाठी आमदारांनी दिली पत्रे…
शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करावे, या मागणीचे पत्र सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार वगळता इतर जिल्ह्यातील अनेक महायुतीच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली असल्याचे वृत्त आहे. सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार सुहास बाबर यांनी शक्तिपीठ महामार्गाला पाठिंबा देत आटपाडी व खानापूर तालुक्यातून जावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. भविष्यात सर्वच आमदार यासाठी आग्रही राहतील का? असा सवाल उपस्थित होत आह

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



