rajkiyalive

jayant patil news : कासेगावाचे जयंत केसरी बैलगाडी मैदान शंभू-चिमण्या जोडीने मारले

jayant patil news : कासेगावाचे जयंत केसरी बैलगाडी मैदान शंभू-चिमण्या जोडीने मारले : महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख बैलगाडी शर्यतीचे मैदान म्हणून ओळखल्या जाणार्‍या कासेगाव ता.वाळवा येथील जयंत केसरी बैलगाडी शर्यतीच्या तिसर्‍या पर्वाचे मैदान भैरवनाथ प्रसन्न-बापूसो भाडळे (वाघोली-कळंबी) व नवाज पठाण, शाकिर पठाण, बाजी ग्रुप, शार्दूल ग्रुप (तळेगाव) यांच्या शंभू-चिमण्या या जोडीने मारले. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते 5 लाख 16 हजार 265 व कायम शिल्ड बक्षीस देत सन्मानित करण्यात आले.

jayant patil news : कासेगावाचे जयंत केसरी बैलगाडी मैदान शंभू-चिमण्या जोडीने मारले

राज्यातील 325 बैलगाडी मालकांनी सहभाग ः शिस्तबध्द मैदानात हजारो बैलगाडी शौकिनांची उपस्थिती

स्व.शरदअण्णा लाहिगडे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व कासेगाव बैलगाडी संघटनेच्या वतीने आयोजित हिंदकेसरी किताबाने सन्मानित मैदानास राज्याच्या कानाकोपर्‍यातील हजारो बैलगाडी शौकिनांनी हजेरी लावून बैलगाडी शर्यतींचा आनंद लुटला. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या मैदानाच्या शिस्तबध्द नियोजनाबद्दल मुख्य संयोजक अतुल लाहिगडे व त्यांच्या सहकार्‍यांचे उपस्थित मान्यवर व बैलगाडी शौकिनांनी विशेष कौतुक केले.

द्वितीय विजेते-भैरवनाथ प्रसन्न, बापूशेठ पिसाळ चोराणे, आई अंबिका प्रसन्न-मनोज मिस्त्री आंबवडे यांचा बावर्‍या-सुंदर, तृतीय व चतुर्थ क्रमांकमध्ये सामना- साहिल प्रतिष्ठान दोरलीवाडी पेरगाव, काळूबाई प्रसन्न, माजी सरपंच यशवंत संतु ढाणे, आर्यन सागर घाडगे, श्री क्षेत्र भरतगांव यांचे हरण्या-बब्या डॉन, 4 बाय 4 गजा-खंड्या, पाचवा विजेते-नाथसाहेब मोहिल शेठ धुमाळ सुसगांव मुळशी यांचे बकासुर-जलवा, सहावा विजेते-स्व.प्राजक्ता सुर्वे प्रणयराज मलकापूर (कराड) यांचा गजा-दिल, सातवा क्रमांक- कु.सिद्धी मच्छिंद्र मोहिते वाई, कु.नंदिनी विक्रम डोंगरे यांचे-लखन व रुद्रा. चंद्रकांत कोकाटे (वडूज), रणजित बनसोडे (बांबवडे) व सुनिल मोरे (पेडगाव) यांनी अतिशय प्रभावी असे सूत्रसंचालन केले.

सकाळी 9 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, विराज उद्योग समूहाचे चेअरमन विराज नाईक, माजी नगरसेवक खंडेराव जाधव यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून शर्यतीचा शुभारंभ करण्यात आला. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे राज्याध्यक्ष नितीन शेवाळे, वरिष्ठ उपाध्यक्ष पै.आनंदराव मोहिते, कार्याध्यक्ष पै.दत्ताभाऊ गायकवाड, सचिव विलास देशमुख, राज्य सदस्य प्रदीप पाटील, यशवंत सह.ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक, राष्ट्रवादीचे इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजी पाटील, संचालक अतुल पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कासेगाव येथे आशियाई महामार्गाच्या पूर्वेस साधारण 10-12 एकर क्षेत्रात मैदानाचे देखणे आयोजन केले होते.

jayant-patil-news-jayant-kesari-of-kasegaon-bullock-cart-field-was-killed-by-shambhu-chimanya-pair

शर्यतीत राज्यातील 325 बैलगाडी मालकांनी भाग घेतला. सकाळी 9.30 पासून दुपारी 4.30 पर्यंत फेर्‍या पळविण्यात आले. यातील प्रथम क्रमांकाच्या बैलगाड्या सेमी फायनलमध्ये पोचल्या. दुसर्‍या विजेत्या बैलगाडी मालकांना प्रत्येकी दोन पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. सेमी फायनलमध्ये पोचलेल्या 47 बैलगाड्यांतून प्रत्येकी 6-7 बैलगाड्यांच्या 7 फेर्‍या पळविण्यात आल्या. यातील प्रथम क्रमांकाच्या 7 बैलगाड्या फायनलमध्ये पाळल्या आणि यातून 7 विजेते मिळाले. कासेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे व त्यांच्या सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

विकास लाहिगडे, मकरंद माने, विक्रम गावडे, विकास पाटील, सोमनाथ लाहिगडे, अक्षय लाहिगडे, संभाजी पाटील, अमोल ठोंबरे, सोन्या साकुर्डीकर, सुशांत माने, जितेंद्र पाटील, बजरंग माळी, शरद शिणगारे, अनिकेत कुंभार, कन्हैया बोडरे, पोपट माने, सागर पाटील, विजय काकडे, अभिषेक दंडवते, सागर कांबळे, अभिनव उबाळे, योगेश मोठे, माळशिद शेंडगे, मोन्या मुल्ला, विनोद लाहिगडे, गजराज देशमुख, सुरज देशमुख, साहिल शेख, दिग्विजय बडेकर, अमित देशमुख यांच्यासह फाउंडेशनचे कार्यकर्त्यांनी मैदान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
चौकटः- महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या स्पर्धेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांची स्वतंत्र बैठक व्यवस्था केली होती. उपस्थित महिलांमधून ड्रॉ काढून त्यांना पैठणी, नथ व जोडवी बक्षीस देण्यात आली. अंकिता अतुल लाहिगडे, रुपाली खंडेराव जाधव यांच्या हस्ते महिलांना सन्मानित करण्यात आले. होम मिनिस्टर फेम तेजस्विनी शहा इस्लामपूर यांनी सूत्रसंचालन केले.

आ.जयंतराव पाटील यांचा’अनोख्या भेटी’ने विशेष सन्मान

अतुलभाऊ लाहिगडे मित्र परिवाराच्या वतीने आ.जयंतराव पाटील यांचा मानाचा फेटा, शाल, पुष्पहार व विशेष फोटो देऊन सत्कार करण्यात आला. या फोटोत विविध दिशेने पाहिले की, एका फोटोतच लोकनेते स्व.राजारामबापू पाटील, श्रीमती स्व.कुसुमताई पाटील व आ.जयंतराव पाटील दिसत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज