ladki bahin yojna news : लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी प्रयत्नशील : उपसभापती निलम गोर्हे : महायुती सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रूपये देण्याचे वचन दिले होते, ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. याबाबत नियोजन केले जात आहे. याशिवाय आणखी काही योजनांचा फायदा दिला जाऊ शकतो का? याबबतही आखणी केली जात आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे यांनी केले. येथील दैवज्ञ भवनमध्ये शिवसेनेचा महिला मेळावा झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
ladki bahin yojna news : लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी प्रयत्नशील : उपसभापती निलम गोर्हे
यावेळी संपर्कप्रमुख सुनिता मोरे, ि जल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, बजरंग पाटील, रावसाहेब घेवारे, संजय विभुते, ज्योती दांडेकर, रूक्मिणी आंबिगेर, अर्चना माळी, राणी कमलाकर, मनिषा पाटील, आशा पोतदार, विद्या गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. उपसभापती गोर्हे म्हणाल्या, प्रतिकूल परिस्थितीत शिवसेनेने अनेक आंदोलने केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन पर्व सुरू केले. या शिवसेनेला शिंदे गट न म्हणता शिवसेना म्हणले पाहिजे. निवडणूक आयोगाने आपल्याला चिन्ह आणि नाव दिले आहे. सांगलीत पूराच्या काळात एकनाथ शिंदे मदतीसाठी धावून आले होते. राज्यातील लाडक्या बहिणींना आणखी काही योजनांचा फायदा देता येईल काय? याची आखणी केली जात आहे.
2100 रूपये देण्याचे वचन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विरोधकांना मात्र याचा राग आहे. आज आपल्यासाठी रस्ते जसे महत्वाचे आहेत, तेवढाच महिलांचा संसारही महत्वाच आहे. त्या पुढे म्हणाल्या, शिवसेना पदाधिकार्यांनी ज्येष्ठ सेवा तक्रार प्राधिकरणकडे पाठपुरावा करून जी मुले वृद्धांचा सांभाळ करत नाहीत, त्यांना मदत करावी. बँकांमध्ये लाडक्या बहिणींना सन्मान मिळाला पाहिजे. ज्या बँका नीट वागणूक देत नाहीत, त्यांचा आढावा घेणार आहे.
ladki-bahin-yojna-news-efforts-are-being-made-for-rs-2100-for-beloved-sisters-deputy-speaker-neelam-gorhe
शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ज्या बँका सहकार्य करत नाहीत, त्यांची माहिती मला द्यावी. महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्या. सभासद मोहिम राबवा. जिल्हा परिषद गट व गण यामध्ये सर्वांना पदे द्या. महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी पुढाकार घ्या. यावेळी जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, बजरंग पाटील, रावसाहेब घेवारे यांची भाषणे झाली. सुनिता मोरे यांनी स्वागत केले.
सांगलीत शिवसेनेचा महापौर व्हावा
माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब घेवारे यांनी शिवसेनेतील आठवणी यावेळी सांगितल्या,. ते म्हणाले, मी 55 वर्षे शिवसेेनेत आहे. एकेकाळी मुंबईनंतर सांगलीची शिवसेना अग्रेसर होती. गाव तिथ शिवसेनेची शाखा होती. पुन्हा ते दिवस आले पाहिजेत. सांगलीत शिवसेेनेचा महापौर झाला पाहिजे. मुंबईबरोबर पुन्हा सांगलीचे नाव आले पाहिजे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.