miraj crime news : मिरजेतून चोरी झालेल्या बाळाचा 48 तासात शोध : मिरज शासकीय रुग्णालयातील प्रसूती विभागातून कविता आलदार यांच्या तीन दिवसाच्या बाळाची शनिवार दिनांक 3 मे रोजी चोरी झाली होती . पोलिसांची पथके बाळाचा व बाळ चोरी करणार्या महिलेचा कसून शोध सुरु केला होता . पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत असताना संशयीत महिला सारा सायबा साठे या महिलेकडून बाळाला ताब्यात घेतले. 48 तासानंतर पोलिसांनी आईची व बाळाची भेट घडवून आणली. बाळाला पाहून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. संशयित सारा साठे महिलेला ताब्यात घेतले असून हे कृत्य कशासाठी केले याची माहिती पोलिस घेत आहेत.
miraj crime news : मिरजेतून चोरी झालेल्या बाळाचा 48 तासात शोध
मिरज शासकीय रूग्णालयाच्या प्रसुती विभागातून सांगोला येथील कविता समाधान आलदर यांच्या तीन दिवसाच्या बाळाची अज्ञात महिलेने चोरी केल्याची घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.
बाळ चोरी करणार्या अज्ञात महिलेचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. कविता आलदार या प्रसुतीसाठी मिरज शासकीय रूग्णालयात दाखल झाल्या होत्या. रूग्णालयात त्यांच्या सोबत आई व वडील होते. संशयीत महिलेने आलदर यांचे आई, वडील, इतर नातेवाईकांचा विश्वास संपादन केला.
कविता आलदर यांचे आई, वडील हे जेवायला गेल्यानंतर संशयीत महिलेने कविता अलदर यांच्या बाळाला घेवून बीसीजी लस सोळा नंबरला टोचायचे असे सांगितले. तीन दिवसाच्या मुलाला घेवून महिला तेथून गेली.
महात्मा गांधी चौक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी शासकीय रुग्णालय परिसरात कसून तपास सुरू केला होता. पोलिसांना महिला सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्या महिलेला तासगाव तालुक्यातील सावळज येथून संशयीत महिला सारा सायबा साठे या महिलेस ताब्यात घेतले असून त्याच्याकडून बाळाला ताब्यात घेतले. या महिलेले बाळाची का व कशासाठी चोरी केली याची माहिती गांधी चौकी पोलिस माहिती घेत आहेत.
पोलिसांनी 48 तासानंतर बाळाची आणि आईची भेट घडवून आणली. आईची आणि बाळाची भेट झाल्यानंतर हॉस्पिटलमधील सर्वांच्या डोळ्यात आनंदाचे भाव होते. तसेच पोलिसांच्या या तपासाचे सर्वत्त कौतुक होत आहे. पोलिसांनी संशयीत महिलेचा व बाळाचा शोध घेण्यासाठी तपास गतीमान केला होता.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.