jat crime news : सनमडी साठवण तलावात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

SHARE:

jat crime news : सनमडी साठवण तलावात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू : जत तालुक्यातील सनमडी येथे शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. साठवण तलावाच्या काठावर बसलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात पडून बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सनमडी परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

jat crime news : सनमडी साठवण तलावात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

मृत मुलांची नावे हर्षद संजय कांबळे (वय 16) व जगदीश वसंत मोरे (वय 15) अशी आहेत. हर्षद याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती, तर जगदीश हा नववी इयत्तेत शिक्षण घेत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, कुणीकोनूर येथील मत्स्य ठेकेदार संजय कांबळे यांच्याकडे सनमडी येथील साठवण तलावाचा मत्स्य ठेका आहे. शुक्रवारी संजय कांबळे हे आपल्या मुलीच्या सीईटी परीक्षेसाठी विटा येथे गेले होते. दरम्यान, त्यांच्या ठिकाणी काम करणारा मजूर तलावावर मासेमारीसाठी गेला होता. त्याच्यासोबत संजय कांबळे यांचा मुलगा हर्षद तसेच भाचा जगदीश मोरे हे दोघेही गेले होते. संजय कांबळे यांचा भाचा जगदीश हा मूळचा बीड येथील असून, तो शिक्षणा साठी मामा कडेच आहे.

दोन्ही मुले तलावाच्या काठावर बसली असताना एका मुलाचा अचानक तोल जाऊन तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसराही पाण्यात गेला. दोघांनाही पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने तलावाकडे धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता.

हर्षद कांबळे याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. त्याला भविष्यात सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होते. निकालाची उत्सुकतेने वाट पाहत असतानाच नियतीने त्याच्यावर घाला घातला.
सायंकाळी उशिरा दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. रात्री उशिरापर्यंत जत पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

मृतदेहांची अशी ही हेळसांड

सनमडी तलावात बुडालेल्या हर्षद आणि जगदीश यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतरही त्यांची हेळसांड थांबली नाही. सुरवातीला ही घटना उमदी पोलीस हद्दीत येत असल्याने मृतदेह शवच्छेदनासाठी उमदी कडे नेण्यात आले. तिथे गेल्या नंतर पुन्हा ते साठ किलो मीटर वरून जत ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले. जत मध्ये मृतदेह आणल्या नंतर देखील तब्ब्ल साडे तीन तासा नंतर पोस्ट मार्टम करणारा व्यक्ती आल्या. नंतर पुढील सोपस्कर करण्यात आले. ही दिरंगाई आणि पोलिसांच्या पंचनामा कागद पत्रातील काही गंभीर चुका यावर नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात तीव्र नाराजी व्यक्त केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *