kolhapur murdar news : बापानेच केला मुलाचा गेम! व्यसनी मुलाचा खून करून मिरवणुकीत दगावल्याचा बनाव : कोल्हापूर : दारूच्या नशेत घरात सर्वांना त्रास देणार्या मुलाचा रागाच्या भरात चाकूने भोसकून खून केल्यानंतर तो शिवजयंतीच्या मिरवणुकीत ट्रॉलीचा पत्रा लागून दगावल्याचा बनाव बापाने केला होता. मात्र, राजारामपुरी पोलिसांनी अवघ्या 12 तासांत बनाव उघडकीस आणून गुन्ह्याचा उलगडा केला.
kolhapur murdar news : बापानेच केला मुलाचा गेम! व्यसनी मुलाचा खून करून मिरवणुकीत दगावल्याचा बनाव
विक्रमनगर येथे राहत्या घरी सोमवारी (दि. 20) रात्री नऊच्या सुमारास घडलेल्या घटनेत जुनेद गफूर पठाण (वय 21) याचा खून झाला. याप्रकरणी पोलिसांनी मृताचा बाप गफूर सुलतान पठाण (40, दोघे रा. स्वामी समर्थ कॉलनी, विक्रमनगर, कोल्हापूर) याला अटक केली.
राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिकन विक्री करणारा गफूर पठाण हा पत्नी आणि दोन मुलांसह विक्रमनगरात राहतो. त्याचा मोठा मुलगा जुनेद याला दारूचे व्यसन लागले होते. नशेत तो घरी सगळ्यांना त्रास देत होता.
कुटुंब उद्ध्वस्त
गफूर पठाण हा चिकनची विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मोठा मुलगा व्यसनाच्या आहारी गेल्याने कुटुंब चिंतेत होते. मुलामध्ये सुधारणा व्हावी यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, रागाच्या भरात केलेल्या कृत्याने बापाच्या हाताने मुलाचा खून झाला. घरातील कर्ता पुरुष पोलिस कोठडीत गेल्याने पठाण कुटुंब उद्ध्वस्त झाले. मंगळवारी सायंकाळी मुलावर अंत्यविधी केल्यानंतर बापाला अटक केली.
गुन्ह्यातील चाकू जप्त
गफुर याने खुनाची कबुली देताच पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला तसेच गुन्ह्यातील चाकू आणि रक्ताने माखलेली कपडे जप्त केली. शिवजयंतीच्या मिरवणुकीत घटना घडल्याचे समजताच पोलिसांनी तपास करून खुनाचा उलगडा केला.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










