jayant patil news : राजारामबापू कारखान्याकडून ऊसाला पहिली उचल प्रतिटन रुपये 3900 जाहीर ः प्रतिक पाटील : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2026-27 मध्ये साखराळे, वाटेगांव-सुरुल आणि कारंदवाडी युनिटकडे गळीतास येणार्या ऊसाला पहिली उचल प्रतिटन रुपये 3900 जाहीर केली. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी मंगळवारी दुपारी ही माहिती दिली.
jayant patil news : राजारामबापू कारखान्याकडून ऊसाला पहिली उचल प्रतिटन रुपये 3900 जाहीर ः प्रतिक पाटील
प्रतिक पाटील पुढे म्हणाले, आम्ही लोकनेते राजारामबापू पाटील यांचा आदर्श आणि माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने ऊस उत्पादक शेतकर्यांचे हित जपत, ऊस उत्पादक शेतकर्यांना अग्रेसर ऊस दर दिलेला आहे. यावर्षीही ही परंपरा कायम राहील. आपण यावर्षीपासून आपल्या साखर कारखान्यास सातत्याने ऊस पुरवठा करणार्या ऊस उत्पादक शेतकर्यांसाठी तिहेरी लाभ देणारी राजारामबापू कुटुंब लाभ योजनाही लागू केलेली आहे.

आपल्या कारखान्याची वाटचाल ही शेतकरी, सभासद, कामगार आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाशी जोडलेली आहे. शेतकर्यांनी कारखान्यावर दाखवलेला विश्वास, हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे. हा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी शेतकर्यांना त्यांच्या कष्टाचा सन्मान करणारा योग्य मोबदला मिळावा, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक प्रगती व्हावी आणि सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तरी ऊस उत्पादक शेतकर्यांनी आपला सर्व ऊस आपल्या साखर कारखान्यास देवून सहकार्य करावे, असे आवाहनही प्रतिक पाटील यांनी केले आहे.
याप्रसंगी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालक देवराज पाटील, प्रदिपकुमार पाटील, कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, प्र.कार्यकारी संचालक विजय मोरे, मुख्य लेखापाल संतोष खटावकर प्रामुख्याने उपस्थित होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










