deshing news : देशिंग येथे ऊस तोड महिला व चिमुकल्याचा विहिरीत बुडून मृत्यू

SHARE:

deshing news : देशिंग येथे ऊस तोड महिला व चिमुकल्याचा विहिरीत बुडून मृत्यू : कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग येथे विहिरीत बुडून ऊसतोड मजूर महिला व दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या धाडसी कार्यामुळे काही मिनिटांत दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. रविवारी सकाळी ही दुर्देवी घटना उघडकीस आली आहे. ऊस तोडणी मजूर महिलेचे नांव प्रिती मनोहर राठोड ( वय 25) व श्रीहंन मनोहर राठोड ( वय 2 ) असे मृत चिमुकल्याचे नांव असून विजापूर कर्नाटक येथील रहिवाशी आहेत.

deshing news : देशिंग येथे ऊस तोड महिला व चिमुकल्याचा विहिरीत बुडून मृत्यू

देशिंग येथील देसाई वस्ती परिसरात ऊसतोडीसाठी आलेल्या मायलेकाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
पती पत्नी यांच्यात काही कारणास्तव वाद झाल्यानंतर शनिवारी दुपारी दोन वाजल्यानंतर महिला व तिचे लहान बाळ बेपत्ता झाल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. नातेवाईकांनी दोघांचा परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र त्यांचा शोध लागला नाही.

रविवार दि.15 नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास नंदकुमार घोरपडे यांच्या विहिरीतील पाण्यावर महिलेची चप्पल तरंगताना आढळून आली. त्यामुळे विहिरीत शोध घेतला असता महिला व तिचे बालक विहिरीत असल्याचे निदर्शनास आले.
या घटनेची माहिती सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाला देण्यात आली. माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी धाव घेतली. संबंधित विहीर अंदाजे 70 फूट खोल असून त्यामध्ये सुमारे 30 फूट पाणी होते.स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या धाडसी कार्यामुळे अवघ्या काही मिनिटांत महिला व तिच्या दोन वर्षांच्या चिमुकल्या बालकाचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.

सांगली येथील स्पेशल रेस्क्यू फोर्सचे सिनिअर कमांडर कैलास वडर, कमांडर महेश गव्हाणे,कृष्णा हेगडे,सागर जाधव,इर्शाद कवठेकर, लहू घोरपडे,आकाश घोलप,अमीर नदाफ यांनी दोन्ही मृतदेह शोधून बाहेर काढले. मृतदेह शवविच्छेदनासाठी कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन करण्यात आले नव्हते. उपजिल्हा रुग्णालयासमोर दोन्हीकडचे नातेवाईक रात्री उपस्थित होते

मृत महिलेचे आई वडील व नातेवाईक सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कवठेमहांकाळ येथील दाखल झाले होते. मृत महिलेचे वडिल रमेश चव्हाण रा. कुन्नूर तांडा जि. विजापूर हे पोलीसांना माहिती सांगत होते. नंतर उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. महिलेच्या नातेवाईकांचा आक्रोश होत होता. सन 2019- 2020 या कालावधीत लग्न झाले आहे. मृत महिलेला एकूण तीन मुले आहेत. मोठी दोन मुले विजापूर येथे आजोबा आजीजवळ असतात. पती मनोहर राठोड, पत्नी प्रिती लहान मुलगीसह ऊस तोडणीसाठी आले आहेत.

तसेच मृत महिलेची नणंद व तिचे पतीही याच टोळीत ऊसतोड करीत आहेत. ही घटना शनिवारी दुपारी घडली असताना विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी बेपत्ता असल्याची माहिती का सांगितली नाही. असा वडिल रमेश चव्हाण व नातेवाईक करीत आहेत. तसेच विवाहानंतर वेळोवेळी दोन लाख रूपये व सोने दिले असल्याचे वडिल रमेश चव्हाण यांनी सांगितले. तसेच तक्रार घेतल्याशिवाय मृत ताब्यात घेणार नसल्याचे मृत महिलेचे वडिल व नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान मृत महिलेच्या वडिलांची तक्रार दाखल करून घेणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *