sangli crime news : सांगलीत डंपरच्या धडकेत कसबेडिग्रज मधील विवाहिता ठार

SHARE:

sangli crime news : सांगलीत डंपरच्या धडकेत कसबेडिग्रज मधील विवाहिता ठार : शहरातील विश्रामबाग येथे अतिशय वर्दळीचा असलेल्या अलदर चौकात आज दुपारी बाराच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एका विवाहितेचा जागीच चिरडून मृत्यू झाला, तर पती जखमी झाले आहेत. सविता दीपक चव्हाण (वय 39, रा. कसबेडिग्रज, ता. मिरज) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

sangli crime news : सांगलीत डंपरच्या धडकेत कसबेडिग्रज मधील विवाहिता ठार

तिचे पती दीपक प्रकाशराव चव्हाण हे जखमी झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी डंपर चालक महंमद अफसर (रा. उत्तरप्रदेश) याच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चव्हाण दांपत्य आपल्या ई-दुचाकी (एमएच 10 ईबी 2799) वरून विश्रामबाग भागातून जात होते. आलदार चौकात पाठीमागून येणार्‍या डंपर (केए 28 एए 3927) ने त्यांच्या दुचाकीला घासून निघाला. त्यावेळी चालक चव्हाण यांना अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांचा अपघात अपघातात सविता या डंपरखाली पडल्या. त्यांच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. तर दीपक चव्हाण हे बाजूला फेकले गेल्याने किरकोळ जखमी झाले.

हा अपघात अत्यंत गजबजलेल्या आलदार चौकात घडल्यामुळे घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांची भेट दिली. तातडीने पंचनामा करण्यात आला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, आलदार चौक परिसरात शाळा, महाविद्यालय, मोठा मॉल, व्यापारी संकुल आहेत. याठिकाणी चोवीस तास वाहतूकीची कोंडी असते. यापुर्वी या चौकात वाहतूक पोलिस नियुक्त होते. त्यांच्याकडून वाहतूक नियमन केले जात होते. परंतू पोलिस नसल्याने रस्यावर बेकायदेशीर पार्किंग होत आहे. त्यामुळे वाहतूकीसाठी रस्ता चिंचोळा झाला आहे. त्यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *