dcc bank news : सांगली जिल्ह्यात साडेनऊ हजार शेतकर्‍यांना 67.25 कोटीची कर्जमाफी

SHARE:

dcc bank news : सांगली जिल्ह्यात साडेनऊ हजार शेतकर्‍यांना 67.25 कोटीची कर्जमाफी : राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेसाठी जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील जिल्ह्यातील आणखी 9 हजार 369 शेतकर्‍यांना 67 कोटी 25 लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. त्यामध्ये जिल्हा बॅँकेच्या 8 हजार 335 शेतकर्‍यांच्या समावेश असून त्यांना 54 कोटी 82 लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर झाली आहे. आधार प्रमाणीकरण व अ‍ॅग्रीस्टॅक नसल्याच्या कारणांनी पहिल्या यादीतील अद्याप साडेचार हजार शेतकरी वंचित असल्याचे स्पष्ट झाले.

dcc bank news : सांगली जिल्ह्यात साडेनऊ हजार शेतकर्‍यांना 67.25 कोटीची कर्जमाफी

महायुती सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. या योजनेतंर्गत पात्र शेतकर्‍यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पात्र सुमारे 56 हजार शेतकर्‍यांची माहिती बॅकांनी शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली आहे.

त्यातील कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या 38 हजार 865 शेतकर्‍यांची पहिली यादी शासनाने मागील महिन्यात जाहीर केली आहे. या शेतकर्‍यांना यात जिल्हा बॅँकेच्या 34 हजार शेतकर्‍यांचा समावेश होता. या पात्र शेतकर्‍यांना शासनाने आधार प्रमाणीकरण, अ‍ॅग्रीस्टॅक व अन्य कागदापत्रांची पुर्तता करण्याचे अवाहन केले होते.

पहिल्या यादीतील पात्र 38 हजार 865 शेतकर्‍यांपैकी पहिल्या टप्यात 21 शेतकर्‍यांना 156 कोटी रुपयांची कर्जमाफी यापूर्वी मिळाली आहे. तर आता आणखीन 9 हजार 369 शेतकर्‍यांना 67 कोटी 25 लाख रुपये कर्जमाफी झाली आहे. त्यामुळे या यादीतील ही रक्कम मंगळवारी बँकांच्या खात्यावर वर्ग झाली आहे. यामुळे पहिल्या यादीतील 30 हजार 369 शेतकर्‍यांना 223 कोटी 25 लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. या यादीतील अद्याप आठ हजारांवर पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही.

जिल्ह्यातील अद्याप साडे चारहजार शेतकर्‍यांनी आद्याप आधार प्रमाणीकरण, अ‍ॅग्रीस्टॅक आदी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. दुसर्‍या टप्यात 9 हजार 369 शेतकर्‍यांपैकी 8 हजार 335 शेतकरी जिल्हा बॅँकेचे सभासद आहेत. त्यांना 55 कोटी 82 लाख 94 हजार 35 रुपयांचा कर्जमाफी मिळाली आहे.

जिल्हा बॅँकेचे लाभार्थी शेतकरी व रक्कम
तालुका शेतकरी रक्कम (कोटीत)
आटपाडी 313 2.17
जत 2835 18.86
क.महांकांळ 636 3.44
कडेगाव 342 2.58
खानापूर 339 2.34
मिरज 1260 9.23
पलूस 529 3.78
शिराळा 349 1.53
तासगाव 928 7.18
वाळवा 804 4.67
एकूण 8335 55.82

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *