ichalkaranji murdar news : झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात खलबत्ता घालून खून : कौटुंबिक वादातून पत्नीने झोपेत असलेला पती सागर दीपक बुरसे (वय 35, रा. त्रिशूल चौक, गावभाग) याच्या डोक्यात खलबत्ता घालून खून केला. ही धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. खुनानंतर पत्नी वैशाली हिने मुलीला सोबत घेऊन थेट पोलिस ठाणे गाठत गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
ichalkaranji murdar news : झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात खलबत्ता घालून खून
इचलकरंजी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात सागर हे कर्मचारी होते. सागर आणि वैशाली यांच्यात कौटुंबिक कारणांवरून वारंवार वाद होत होते. काही वर्षांपूर्वी ते विभक्त झाले होते; मात्र गेल्या महिन्यांपासून पुन्हा एकत्र राहत होते. आज पहाटे चारच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर ते झोपी गेले. झोपेत असलेल्या सागर यांच्या डोक्यात वैशाली हिने खलबत्ता घातल्याने त्यांचा मृत्यू झाला.
सकाळी उठल्यानंतर नेहमीचा दिनक्रम आटोपून वडिलांना व भावाला खून केल्याची माहिती दिली भावासह मुलीला सोबत घेत तिने पोलिस ठाणे गाठले आणि पतीचा खून केल्याची कबुली दिली. माहिती मिळताच गावभागचे पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या पथकाने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
पोलिसांनी संशयित वैशालीला ताब्यात घेतले आहे. सागर याचा मृतदेह पाहून आई बहिणीसह नातेवाईकांनी आक्रोश केला. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










