vishwjit kadam news : कोयनेचे पाणी अडवाल तर गाठ माझ्याशी – विश्वजीत कदम

SHARE:

vishwjit kadam news : कोयनेचे पाणी अडवाल तर गाठ माझ्याशी – विश्वजीत कदम : कोयनेतील पाणी देण्यास कोणीतरी अडवणूक करत असेल तर गाठ माझ्याशी आहे असा गभिर्ंत इशारा डॉ. विश्वजित कदम यांनी सोमवारी दिला. तसेच दि. 30 ऑक्टोबर रोजी कालवा समितीची बैठक होणार असून, या बैठकीत पाणी प्रश्नावर मार्ग निघेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. गेल्या चार दिवसापासून कृष्णा नदी पात्र कोरडे पडले असून नदीकाठची शेती अडचणीत आली आहे. भिलवडी (ता. पलूस) येथील ऐतिहासिक घाटाच्या ठिकाणी आ. डॉ. कदम यांनी ठिय्या आंदोलन करत शेतकर्यांशी संवाद साधला.

vishwjit kadam news : कोयनेचे पाणी अडवाल तर गाठ माझ्याशी – विश्वजीत कदम

यावेळी ते म्हणाले, सांगली जिल्ह्याला कोंयनेतून पाणी देण्यापासून कोणीतरी अडवणूक करत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याला पाणी देण्यास कोणी विरोध करत असेल, तर गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवावे, असा गर्भित इशाराच कदम यांनी संबंधित नेत्याला दिला आहे.
ऑक्टोबर महिन्यातच कृष्णाचे पात्र कोरडे पडल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वीज निर्मितीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकतात; मात्र शेती आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज सर्वप्रथम भागवली पाहिजे, कोयना धरणात 85 टीएमसी पाणी आहे.

यापैकी 60 टक्के पाणी वीज निर्मितीसाठी आणि 30 ते टक्के पाणी शेती व पिण्यासाठी नियोजित आहे. मात्र, सध्या दुष्काळी स्थिती असल्याने शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाण्याची गरज आहे. वीजेच्या वापरातील पाणी शेतीसाठी आणि पिण्यासाठी उपलब्ध होउ शकते. वीजेची उपलब्धता सौर, पवन उर्जा होउ शकते. तसेच अन्य राज्याकडून वीज उपलब्ध करता येउ शकते. मात्र पाण्याची उपलब्धता कशी करणार. यासाठी उपलब्ध पाणी शेती व पिण्यासाठी प्राधान्याने मिळावे अशी आमची भूमिका आहे. सध्या ऑक्टोबर महिन्यातच नद्यांमधील पाण्याची स्थिती चिंताजनक होत असेल, तर आगामी मार्च महिन्यात परिस्थिती किती गंभीर होईल, याचा आतापासून विचार करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर असताना जिल्ह्याला पाणी मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्याबाबत कोणतीही अडवणूक सहन केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, आंदोलन स्थळावरून आ. कदम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती कथन केली. कालवा समितीची बैठक शुक्रवार दि. 30 ऑक्टोबर रोजी बोलावण्याचे मान्य केले असून या बैठकीत पाणी प्रश्न मार्गी लागेल असा विश्वासही देण्यात आला. दर जाहीर करण्याची गरज अन्यथा हा वणवा सगळीकडे पसरताना दिसत आहे.

ऊस उत्पादकांना योग्य दर मिळावा, यासाठी विविध ठिकाणी आंदोलनात्मक पावले उचलली जात आहेत. मात्र, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ऊस वाहतूक करणार्या वाहनांना आग लावणे आणि वाहतूक रोखणे यांसारख्या घटना घडत असल्याने परिस्थिती संवेदनशील बनली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *