shetkri sangtna news : ऊस दरासाठी आक्रमक होवू स्वाभिमानीच्या आंदोलनात सहभागी व्हावे ः जिल्हाध्यक्ष विश्वास कोळी

SHARE:

shetkri sangtna news : ऊस दरासाठी आक्रमक होवू स्वाभिमानीच्या आंदोलनात सहभागी व्हावे ः जिल्हाध्यक्ष विश्वास कोळी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे दर जाहीर करावा अन्यथा ऊसतोड, काटाबंद आंदोलन तीव्र करण्यात येईल, त्यामध्ये शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे, इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास कोळी यांनी दिला.

shetkri sangtna news : ऊस दरासाठी आक्रमक होवू स्वाभिमानीच्या आंदोलनात सहभागी व्हावे ः जिल्हाध्यक्ष विश्वास कोळी

जिल्ह्यातील कारखाने सुरु होवून तीन आठवडे झाले, तरी अद्याप ऊस दराचा निर्णय झालेला नाही. जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळावा आणि उसाला न्याय्य दर मिळावा, यासाठी आता शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ज्या पद्धतीने ऊसदराचा प्रश्न मार्गी लावला जातो, त्याच धर्तीवर सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी कोल्हापूर पॅटर्न स्वीकारावा, अशी मागणी आहे.

शेतीचा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रासायनिक खते, औषधे, बी-बियाणे, मशागत, ऊस तोडणी, वाहतूक आणि मजुरी यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांना मिळणारा ऊसदर आणि प्रत्यक्ष उत्पादन खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.

शेतकरी हा साखर उद्योगाचा मुख्य आधार आहे. शेतकर्‍यांच्या उसावर कारखाने चालतात, त्यामुळे शेतकर्‍यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य मिळाले पाहिजे. कोल्हापूर पॅटर्न लागू करण्याची मागणी मान्य झाली नाही, तर सांगली जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. ऊसतोड बंद करून काटाबंद आंदोलनाच्या माध्यमातून कारखान्यांना धडा शिकवला जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष कोळी यांनी दिला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *