rajkiyalive

सांगली लोकसभेसाठी भाजपमध्येच ‘टशन’

शरद पवळ

2014 मध्ये सांगलीच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावत भाजपने लोकसभेची जागा जिंकली आणि संजयकाका पाटील खासदार बनले. त्यानंतर 2019 ला देखील ही जागा खासदार संजयकाका पाटील यांनी कायम राखली. मात्र आता सर्व्हेमध्ये सांगलीची जागा धोक्याची दाखविली आहे. त्यामुळे उमेदवार बदलाच्या चर्चेला ऊत आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे विद्यमान खासदार संजयकाका पाटील तयारी करत असताना भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी देखील शड्डू ठोकत लोकसभेची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे यावर्षी सांगली लोकसभेच्या जागेसाठी भाजपमध्ये ‘टशन’ असणार आहे.

संजयकाकांना शह देत पृथ्वीराज देशमुखांची तयारी

सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला. अनेक वर्षांपासून सांगली लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाने घेतली आहे. सांगलीची जागा काँग्रेसकडून हिसकावून घेण्यासाठी अनेक प्रयोग झाले. याला यश मिळत नव्हते. मात्र 2014 ला काँग्रेसला धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले संजयकाका पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली. यावेळी भाजपच्या नेत्यांनी खासदार पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. भाजपचे माजी आमदार स्व.संभाजी पवार यांनी पुत्र पृथ्वीराज पाटील यांच्यासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची उमेदवारी डावलून खा.संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली. देशात असलेल्या मोदी लाटेमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपने परिवर्तन घडवले.

हेही वाचा

संभाजी पवार गट पुन्हा रिचार्ज होणार

भाजपकडून प्रादेशिक पक्षांचे निर्मुलन

फडणवीसांचा भाजप कधी संपून जाईल सांगता येणार नाही

प्रतिक पाटील यांचा खासदार संजयकाका पाटील यांनी तब्बल दोन लाख 39 हजार मतांनी पराभव केला.

माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांचा खासदार संजयकाका पाटील यांनी तब्बल दोन लाख 39 हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत भाजपचा आत्मविश्वास वाढला होता. खासदार संजयकाका पाटील यांचे भाजपच्या नेत्यांबरोबर बिनसले होते. त्यांची राष्ट्रवादीचे नेते आ.जयंत पाटील यांच्याबरोबर जवळीक वाढली होती. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपचे नेते नाराज होते. जिल्ह्यातील भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. उमेदवारी बदलाचा विषय चांगलाच गाजला. मात्र भाजपच्या वरिष्ठ पातळीवर नेत्यांनी नाराजांची समजूत काढून पुन्हा खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली. आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांचा दीड लाखांच्यावर मताधिक्याने खासदार संजयकाका पाटील यांनी पराभव केला. मात्र गेल्या पंचवार्षिक निवडणुकीतील मताधिक्य घटले होते.

अनेकांनी तर खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी रेटली आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघात सांगली विधानसभा, मिरज, जत, तासगाव-कवठेमहांकाळ, पलूस-कडेगाव, खानापूर आटपाडी हे विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये दोन मतदारसंघात भाजप, दोन मतदारसंघात काँग्रेस, एका मतदारसंघात राष्ट्रवादी तर एका मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे. 2024 मध्ये आता लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी पुन्हा खासदार संजयकाका पाटील प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना आता भाजपचे स्थानिक नेतेच विरोध करत असल्याचे चित्र आहे. अनेकांनी तर खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी रेटली आहे. खासदारांचे भाजपबरोबर असणारे ट्युनिक देखील आता कमी होऊ लागले आहे. आ. गोपीचंद पडळकर, पलूस-कडेगावचे भाजपचे नेते, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जतचे माजी आमदार विलासराव जगपात यांच्यासह अनेक नेते आता थेट खासदारांना विरोध करू लागले आहेत. यावर्षी खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी नको, जनतेत त्यांच्याबद्दल नाराजी असल्याचे भाजपचे नेते वरिष्ठांना सांगत आहेत.

हेही वाचा

राजकीय आखाड्यातील पैलवान

चार वर्षात त्यांनी अनेक भागाकडे दुर्लक्ष केले असल्याची तक्रार भाजपच्या नेत्यांचीच आहे.

शिवाय खासदार संजयकाका पाटील यांनी रेल्वे, सिंचन योजना, राष्ट्रीय महामार्ग, सिंचन योजना आदी कामांसह प्रस्तावित लॉजिस्टिक पार्क, आयटी पार्क, विमानतळ आदींबाबत चर्चा सुरू केली आहे. मात्र विमानतळ व ड्रायपोर्ट यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू नाहीत. त्यामुळे त्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. चार वर्षात त्यांनी अनेक भागाकडे दुर्लक्ष केले असल्याची तक्रार भाजपच्या नेत्यांचीच आहे. त्यामुळे काकांकडून देखील आता विकासकामांवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सर्व्हेमध्ये देखील सांगलीची जागा धोक्यात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यावर्षी भाजपमध्ये उमेदवार बदलाच्या चर्चेला वेग आला आहे.
तर दुसरीकडे भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी खासदार संजयकाका पाटील यांना शह देत सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी फिल्डिंग लावत आहेत. त्यांनी भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या आहेत.

भाजपच्या दुसर्‍या फळीतील नेत्यांबरोबर चर्चा सुरू केली आहे.

त्यांच्याकडून देखील त्यांना होकार मिळाल्याची चर्चा आहे. स्वत:च्या पलूस-कडेगाव मतदार संघाबरोबर खानापूर-आटपाडी, जत, मिरज विधानसभा मतदारसंघातील विविध गावामध्ये त्यांनी कार्यक्रमांना हजेरी लावत भाजपच्या दुसर्‍या फळीतील नेत्यांबरोबर चर्चा सुरू केली आहे. शिवाय भाजपच्या पक्षीय कार्यक्रमांची जबाबदारी देखील ते घेत आहेत. त्यामुळे ते लोकसभा उमेदवारीच्या पिक्चरमध्ये येत आहेत. त्यामुळे यावेळी भाजपमध्ये उमेदवारीवरून टशन दिसून येत आहे.

पृथ्वीराज देशमुखांना वरिष्ठ नेत्यांचा ग्रीन सिग्नल?

भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख लोकसभेसाठी इच्छूक आहेत. त्यानुसार त्यांनी जिल्हाभर दौरा देखील सुरू केला आहे. भाजपच्या जिल्हा नेत्यांच्या त्यांच्या भेटी सुरू आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी जिल्ह्यातील अनेक नेत्यांच्या देखील वरिष्ठ पातळीवर भेटीगाठी सुरू आहेत. विविध कार्यक्रमांना त्यांची हजेरी देखील असते. त्यामुळे त्यांना राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लोकसभेसाठी ग्रीन सिग्नल दिला की काय? अशी चर्चा आता रंगली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज