rajkiyalive

पश्चिम महाराष्ट्रात महायुतीच्या सर्वच जागा डेंझर झोनमध्ये

गटबाजी अन् जागावाटपाचा पेच महाविकास आघाडीच्या पथ्यावर : सर्वोक्षणात सर्वच जागा डेंझर झोनमध्ये

जनप्रवास : अमृत चौगुले

(loksabha ) पश्चिम महाराष्ट्रात त्रांगड्याचा महायुतीला धोका

लोकसभेच्या मैदानात भाजपच्या बेरजेच्या राजकारणात एकीकडे अंतर्गत गटबाजी आणि दुसरीकडे जागावाटपाचे त्रांगडे महायुतीला धोक्याची घंटा ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अर्थात हे सर्व महाविकास आघाडीच्या पत्थ्यावर पडत असल्याचे सर्व्हेक्षणातून पुढे आले आहे. यातूनच सांगली, कोल्हापूर, सातारा, हातकणंगलेसह माढ्याच्या जागेवरही महाविकास आघाडी बाजी मारू शकेल असे संकेत आहेत. आता यातून महायुती कशी पॅचअप करेल यावर त्याचा सोक्षमोक्ष लागणार आहे.

*राज्यातील ब्रेकिंग राजकिय बातम्या आणि घडामोडी मिळवण्यासाठी ‘राजकीय लाइव्ह.com या आमच्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा’*

अवघ्या सहा महिन्यांवर लोकसभा निवडणूक होणार आहे. पुन्हा मोदी सरकार यादृष्टीने देशभराप्रमाणेच महाराष्ट्रातही जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. दुसरीकडे भाजप आणि विशेषत: मोदींवर तानाशाहीचा आरोप करीत रोखण्यासाठी सर्वपक्षीय इंडिया आघाडीने जोरदार व्यूहरचना केली आहे. यासंदर्भात मुंबईत इंडियाच्या बैठकीद्वारे ‘जोडेगा भारत, जितेगा इंडिया’ स्लोगन जाहीर करून एल्गारही करण्यात आला. त्यामुळे एकतर्फी वाटत असलेल्या या लढाईत आता टशन निर्माण झाले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात भाजपविरोधी नाराजीचा फटका

यात अगोदरच पश्चिम महाराष्ट्रात भाजपविरोधी नाराजीचा फटका असल्याचे दिसून येत होते. त्यात विशेषत: सांगली लोकसभा मतदारसंघात विद्यमान संजय पाटील यांच्याविरोधात गटबाजीतून मागील वेळेपेक्षा पक्षांतर्गत नाराजीचा सूर अधिक वाढला आहे. माजी अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार विलासराव जगताप, अजितराव घोरपडे यांच्यात वितुष्ट कायम आहेच. सहयोगी आमदार अनिल बाबर व पाटील यांच्यात परंपरागत संघर्ष कायम आहे. त्यातच या सर्वात समेट घडविण्याची कोणतीच हालचाल सध्या दिसून येत नाही. भरीस भर म्हणून खासदार पाटील यांच्याविरोधातील नाराजी वरपर्यंत या सर्वांनी कळविली आहे. जोडीला पर्याय म्हणून पृथ्वीराज देशमुख यांच्या समर्थनाची शिफारसही केल्याचे समजते.

हेही वाचा

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी

फडणवीसांचा भाजप कधी संपून जाईल सांगता येणार नाही

सांगली लोकसभेसाठी भाजपमध्येच ‘टशन’

ही सर्व बेरीज आणि महायुतीतील नाराजी विशाल पाटील यांच्यासाठी बेरजेची ठरणार आहे.

त्यात पृथ्वीराज देशमुख हे पदावरून उतरल्यानंतर लोकसभेच्या उमेदवारीच्यादृष्टीने जिल्हाभर संपर्कमोहिमेवर आहेत. त्यामुळे उमेदवारी कोणालाही मिळो, पुन्हा भाजपला नाराजीचा फटका आहेच. दुसरीकडे काँग्रेसचे विशाल पाटील यांनी जोरदार बांधणी सुरू केली आहे. जोडीला समझोत्याने राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व जिल्ह्याचे नेते जयंत पाटील (पारदर्शीपणे) यांचे पाठबळ मिळण्याचे संकेत आहेत. काँग्रेसचे आणि विशेषत: आमदार डॉ. विश्वजित कदम यांचे नेतृत्व विशाल पाटील यांनी मान्य केल्याने जिल्ह्यात एकीचा सूर आहे. परिणामी ही सर्व बेरीज आणि महायुतीतील नाराजी विशाल पाटील यांच्यासाठी बेरजेची ठरणार आहे. यातून कशी लढत होवो, सध्या तरी महायुती सांगलीत मायनस आणि महाविकास आघाडी प्लसमध्ये दिसत आहे.

<a target=”_blank” href=”https://www.amazon.in/b?_encoding=UTF8&tag=dineshkum0442-21&linkCode=ur2&linkId=941eecccd2ecf53a4343c60e3f640055&camp=3638&creative=24630&node=3561110031“>100 mobile and asesaris</a>

हातकणंगलेतही शिंदे सेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्याबाबतही तीच परिस्थिती

हातकणंगलेतही शिंदे सेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्याबाबतही तीच परिस्थिती आहे. भाजपचे त्यांच्याशी सूत विशेष जुळलेले नाहीत. दुसरीकडे भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांच्यामुळे पक्षाचे सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांच्या उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे. त्यासाठी त्यांनी लोकसभेच्या उमेदवारीवर दावा सांगितला आहे. आवाडेपुत्र राहुल आवाडे यांनीही भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे तेथेही स्थानिक पातळीवर बेकीचा फटका महायुतीला दिसत आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हातकणंगलेतून मैदानात उतरणार आहेत. अर्थात त्यांनी महाविकास आघाडीतून लढावे यासाठी जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसनेत्यांकडूनही प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील पुत्र प्रतिक पाटील यांचे नावही चर्चेत आहे. अर्थात शेट्टींच्या चर्चेत यशस्वी झाले तर महाविकास आघाडी मजबूत ठरेल असे संकेत आहेत.

हेही वाचा

संजयकाका नेटवर्क अन् विकासकामांत बॅकफूटवर

लोकसभेसाठी आले साडेपाच हजार मतदान यंत्रे

दहा वर्षांत जिल्ह्यात नवीन काय?

मंत्री हसन मुश्रीफांच्या महायुतीतील एंट्रीने गणिते बिघडल्याची चिन्हे

कोल्हापुरातही शिंदेसेनेचे संजय मंडलिक असले तरी मंत्री हसन मुश्रीफांच्या महायुतीतील एंट्रीने गणिते बिघडल्याची चिन्हे आहेत. तेथे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितराजे घाडगे नाराज असून त्यांनी विधानसभेसाठी शड्डू थोपटला आहे. दुसरीकडे विद्यमान खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांनीही पक्षाने आदेश दिल्यास ते किंवा शौमिका महाडिक, अमल महाडिकपैकी कोणीही मैदानात उतरण्याची तयारी दर्शविली आहे. दुसरीकडे कोल्हापूर किंवा हातकणंगलेपैकी एक जागा भाजपला द्यावी असा सूरही कोल्हापूरमधे बळावला आहे. त्याचा फटका महायुतीला बसू शकतो. त्यात राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेल्या मेळाव्यात शरद पवारांच्या व्यासपीठावर खुद्द छत्रपती शाहू महाराज यांनी उतरून पुरोगामी कोल्हापूरचा वारसा जपण्याचे आवाहन केले आहे.

शाहू महाराज किंवा संभाजीराजेंपैकी एकजण महाविकास आघाडीकडून मैदानात उतरावे यासाठीही नेत्यांकडून गळ घालण्याची तयारी

छत्रपती संभाजीराजेही भाजपवर नाराज आहेत. त्यामुळे स्वत: शाहू महाराज किंवा संभाजीराजेंपैकी एकजण महाविकास आघाडीकडून मैदानात उतरावे यासाठीही नेत्यांकडून गळ घालण्याची तयारी सुरू आहे. त्यांनी होकार दिला तर ठीक किंवा प्रसंगी सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी महाविकास आघाडीतून मैदानात उतरावे असाही सूर पुढे आहे. त्यामुळे या तुल्यबळ ताकदीमुळे महायुतीला फटका बसण्याचे संकेत सध्या सर्व्हेतून पुढे आले आहेत.

*राजकारणात आणि राजकारणा पलीकडील महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आता आपल्या सेवेत राजकीय लाईव्ह घेऊन आले आहे मोबाइल अँप. Rajkiya live हे अँप डाउन लोड करा आणि पटापट राजकीय घडामोडीचा आनंद घ्या*
 *Rajkiya Live
सातार्‍यातही उदयनराजे भोसले यांनाच पुन्हा भाजप महायुतीतून पुन्हा मैदानात उतरविण्याची शक्यता

सातार्‍यातही उदयनराजे भोसले यांनाच पुन्हा भाजप महायुतीतून पुन्हा मैदानात उतरविण्याची शक्यता आहे. तेथे पावसात शरद पवाररूपी सह्याद्री पावसात भिजल्याने श्रीनिवास पाटील खासदार झाले होते. आता पुन्हा त्यांनाच शरद पवार महाविकास आघाडीतून मैदानात उतरविण्याची शक्यता आहे. अर्थात उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भाजपमध्ये असले तरी त्यांच्यात टोकाचे वितुष्ट आहे. भरीस भर म्हणून अजित पवार यांच्या गटातून रामराजे नाईक-निंबाळकर महायुतीत आले असले तरी त्यांच्याशीही उदयनराजेंचे वितुष्ट आहे. एकूणच या सर्वाची बेरीज-वजाबाकी सध्या तरी श्रीनिवास पाटील यांच्याच पारड्यात मताधिक्य मिळेल असा जनमताचा कौल दिसून येत आहे.

मोहिते-पाटील भाजपसोबत असले तरी त्यांनी पक्षप्रवेश केलेला नाही.

सोलापूर जिल्ह्यातील माढ्यातही भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याबाबतीत हीच अवस्था आहे. जिल्ह्याचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पाठबळावर निंबाळकर खासदार झाले. पण निंबाळकर आणि त्यांच्यात आता वितुष्ट निर्माण झाले आहे. जरी मोहिते-पाटील भाजपसोबत असले तरी त्यांनी पक्षप्रवेश केलेला नाही. त्यातच शरद पवार यांनी नुकतीच विजयसिंह मोहिते-पाटील यांची अकलूजमध्ये जावून भेट घेतली आहे. त्यातच अलिकडे मोहिते-पाटील आणि आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे यांच्यात समेट घडून आला आहे. त्यामुळे सध्या अजित पवारांना पाठिंबा दिल्याचे सांगितले असले तरी प्रसंगी पुन्हा महाविकास आघाडीतून संजयमामा शिंदे यांना मैदानात उतरू शकतात. तसे झाल्यास महाविकास आघाडी सरस ठरू शकते.

सोलापुरातही मागील विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या जातीच्या दाखल्याचा वाद सुरू

सोलापुरातही मागील विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या जातीच्या दाखल्याचा वाद सुरू आहे. त्यांना यावेळी पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे वर्तविले जात आहे. आता महाविकास आघाडीतून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे मैदानात ताकदीने उतरू शकतात. त्यांनी नकार दिल्यास आमदार प्रणिती शिंदे या मैदानात उतरल्यास त्यांचा मध्य सोलापूर विधानसभा मतदारसंघ रिकामा होण्यासाठी महाविकास आघाडीबरोबरच भाजपअंतर्गत गटबाजीतूनही त्यांना बळ मिळू शकते. तेथे पुत्र किरण देशमुख यांना संधी मिळावी यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांचे छुपे बळ प्रणितींना विजयापर्यंत नेऊ शकते. त्यामुळे तेथेही सर्व्हेत महाविकास आघाडीच सरस दिसून येते. एकूणच या सर्वाच्या शह-काटशहाचा महायुतीला झटका महाविकास आघाडीला बळ देईल असे संकेत आहेत. अर्थात महायुतीला हे नुकसान परवडणारे नसल्याने पॅचअप मोहिम सुरू झाल्यास मात्र चित्र पलटू शकते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज