rajkiyalive

सांगली भाजपमध्ये तीन पैलवानांची दावेदारी

गाडगीळ नसतील तर कोण? अनेकांची नावे पुढे

शरद पवळ,  जनप्रवास 

(SANGLI  VIDHANSABHA ) :  लोकसभेबरोबर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपला चांगलेच फायदेशीर राहणार आहे. त्यामुळे सांगली विधानसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या आता वाढली असल्याचे चित्र आहे. विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांच्याबरोबर तीन पैलवानांनी आखाड्यात शड्डू मारला आहे. विधानसभेसाठी माजी आमदार दिनकर पाटील, पै.पृथ्वीराज पवार, धीरज सूर्यवंशी यांची नावे चर्चेत आहेत. पण यांचे भवितव्य आमदार सुधीर गाडगीळ यांच्या निर्णयावर अवलंबून आहे.
सुधीर गाडगीळ यावर्षी निवडणूक लढणार आहेत की नाही? याची चर्चा मात्र जोरदारपणे सुरू झाली आहे.

सांगली विधानसभा भाजपचा बालेकिल्ला होत चालला आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनी सन 2014 व 2019 मध्ये सलग दोनवेळा निवडणूक जिंकून भाजपचा बालेकिल्ला शाबूत ठेवला. आता ते हॅट्ट्रिक करणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण पक्षामध्ये अनेक इच्छूक वाढत चालल्याने आमदार सुधीर गाडगीळ यावर्षी निवडणूक लढणार आहेत की नाही? याची चर्चा मात्र जोरदारपणे सुरू झाली आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनी दहा वर्षे कोट्यावधी रूपयांची कामे मतदारसंघात केली आहेत. आजपर्यंत मतदारसंघात न झालेली कामे त्यांनी करून दाखविली आहेत. त्यामुळे त्यांची ओळख कार्यसम्राट आमदार म्हणून झाली आहे. राज्यात झालेल्या घडमोडीवेळी मंत्रीपदाची अपेक्षा त्यांना होती. तशी चर्चा देखील राज्यपातळीवर होती. मात्र ऐनवेळी मंत्रीपदाने हुलकावणी दिली.

हेही वाचा

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी

संभाजी पवार गट पुन्हा रिचार्ज होणार

भाजपकडून प्रादेशिक पक्षांचे निर्मुलन

फडणवीसांचा भाजप कधी संपून जाईल सांगता येणार नाही

राजकीय आखाड्यातील पैलवान

भाजपमध्ये इच्छुकांचे प्रमाण वाढल्याने उमेदवार बनलणार की काय? अशी चर्चा आहे.

2024 मध्ये होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत ते पुन्हा रिंगणात उभारणार की नाही? याबाबत अद्याप त्यांनी जाहीर केलेले नाही. पण त्यांनी मतदारसंघात गाठी-भेठी व विकासकामांचे आलेख सुरूच ठेवला आहे. ते पुन्हा उभारतील, अशी आशा आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये इच्छुकांचे प्रमाण वाढल्याने उमेदवार बनलणार की काय? अशी चर्चा आहे. भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी नुकताच स्व.संभाजी पवार समर्थकांचा मेळावा घेतला. लोकसभा, विधानसभा, महापालिकेसह आगामी प्रत्येक निवडणुकीत स्व.संभाजी पवार गट एकजुटीने, ताकदीने उतरू आणि लढून जिंकून दाखवू, असा निर्धार पृथ्वीराज पाटील यांनी केला आहे. त्यामुळे ते विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा उतरणार असल्याची चर्चा समर्थकांमध्ये सुरू झाली आहे.

2014 मध्ये पृथ्वीराज पवार लोकसभेसाठी इच्छूक होते.

2014 मध्ये पृथ्वीराज पवार लोकसभेसाठी इच्छूक होते. त्यांनी लोकसभा मतदारसंघात तयारी देखील सुरू केली होती. मात्र पक्षातून ऐनवेळी राष्ट्रवादीतून आयात केलेले खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पवार कुटुंबिय नाराज होते. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत स्व.संभाजी पवार यांना उमेदवारी मिळेल, अशी आशा असताना पक्षाने आ.सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पवार कुटुंबिय भाजपपासून दूर जात शिवसेनेत गेले. त्यानंतर मध्यल्या काळात भाजपच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांची त्यांचे पॅचअप करत त्यांना पुन्हा भाजपमध्ये आणले. आता ते विधानसभेला शड्डू ठोकणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

माजी आमदार दिनकर पाटील यांनी देखील आमदारकीसाठी प्रयत्न सुरू

तर दुसरीकडे माजी आमदार दिनकर पाटील यांनी देखील आमदारकीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्यावेळी त्यांनी उमेदवारी देखील मागितली होती. आमदार सुधीर गाडगीळ व त्यांचे बिनसले होते. मात्र पुन्हा वाद मिटला. यावर्षी मात्र त्यांनी पुन्हा विधानसभेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना यावर्षी भाजप नसेल तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पर्याय असणार आहे. दिनकर पाटील राष्ट्रवादीत असताना अजितदादा पवार व त्यांचे चांगले संबंध होते. याचा फायदा घेत दिनकर पाटील यावर्षी उमेदवारी मागू शकतात.

हेही वाचा

1952 : पहिल्याच निवडणुकीत वसंतदादांची विधानसभेत एन्ट्री

1957 : नागनाथअण्णा, जी. डी. बापू विजयी

1962 : राजारामबापू मंत्रीमंडळात

युवकांचा आयडॉल म्हणून आता स्थायी समितीचे माजी सभापती धीरज सूर्यवंशी यांची ओळख

तर दुसरीकडे भाजपचा सांगलीतील युवकांचा आयडॉल म्हणून आता स्थायी समितीचे माजी सभापती धीरज सूर्यवंशी यांची ओळख निर्माण होत आहे. महापालिकेत उपमहापौर असताना त्यांनी चांगली कामगिरी केली. स्थायी समितीचे सभापती असताना रेकॉर्डब्रेक 600 कोटींची विकासकामे मनपा क्षेत्रात केली आहेत. भाजपने त्यांच्यावर विश्वास ठेवत युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. या काळात त्यांनी अनेक युवा कार्यकर्त्यांना पक्षाच्या प्रवाहात आणून सामील केले. त्यामुळे भाजपच्या प्रमुख नेत्यांचा त्यांच्यावर चांगला विश्वास बसला आहे. पक्षाचे विविध कार्यक्रम त्यांच्याकडून घेतले जात आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमीला दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी देखील त्यांनी दहीहंडीचे आयोजन केले आहे. त्यामुळे भविष्यातील भाजपचा युवा चेहरा, आणि विधानसभेचा उमेदवार म्हणून त्यांना पाहिले जात आहे. तशी फिल्डिंग देखील त्यांच्याकडून लावली जात आहे.

भाजपच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष

सांगली विधानसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने भाजपच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आ.सुधीर गाडगीळ हॅट्ट्रिक करण्याच्या दृष्टीने यावर्षी पुन्हा सांगली विधानसभेची उमेदवारी घेणार की पक्ष नव्या पैलवानाला संधी देणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज