rajkiyalive

2004 : मदन पाटलांचा दरवाजा फोडून प्रवेश

दिनेशकुमार ऐतवडे, 9850652056

सांगलीचे ज्येष्ठ नेते मदन पाटील यांचा 2 डिसेंबर रोजी जयंती. सांगलाीच्या राजकारणाचा ज्या ज्या वेळी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी मदनभाउंचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. अगदी तरूण वयापासून राजकारणात मुरलेल्या मदन पाटील यांनी अनेक संस्थांवर काम केले. आमदार, खासदार, मंत्री अशी त्यांची कारकिर्द घडली. 2004 मध्ये ते सांगलीतून अपक्ष म्हणून आमदार झाले. त्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा….

 

1999 मध्ये शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापना केली. राज्यातील बहुतांश साखर सम्राट राष्ट्रवादीत दाखल झाले. सांगलीत प्रकाशबापू पाटील आणि विष्णुअण्णा पाटील असे दोन गट होते. प्रकाशबापुंनी काँग्रेसमध्ये राहणेच पसंत केले. विष्णुअण्णा लवकर निर्णय घेत नव्हते. त्यांची व्दिधा अवस्था झाली होती. कारण सहकारामध्ये विष्णुअण्णांचे नाव मोठे होते आणि सहकारावर शरद पवारांचे वर्चस्व होते. त्यामुळे त्यांना निर्णय घेता येत नव्हते.

 

 

इचलकरंचीचे कल्लाप्पाण्णा आवाडे हेही काँग्रेसमध्येच राहिले. विष्णुअण्णा पाटील हेही काँग्रेसमध्येच रहावेत, अशी त्यांची इच्छा होती. आठ दिवस ते विजय बंगल्यावर तळ ठोकून होते. शेवटी विष्णुअण्णांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. विष्णुअण्णांबरोबर मदन पाटील हेही राष्ट्रवादीत गेले. परंतु मदन पाटील यांची राष्ट्रवादीत जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. परंंतु विष्णुअण्णांसोबत त्यांना राष्ट्रवादीत जावे लागले.

राज्यात युतीचे शासन होते. मनोहर जोशी यांच्यानंतर नारायण राणे यांची मुख्यमंत्रीपदावर वर्णी लागली. लोकसभेबरोबरच विधानसभाही घेण्यात आल्या. सांगलीत लोकसभेसाठी प्रकाशबापू यांना संधी मिळाली तर विधानसभेसाठी सांगलीवाडीचे दिनकर पाटील यांना उमेदवारी मिळाली. राज्यस्तरावर राष्ट्रवादी आणि जनता दलाची युती झाल्याने लोकसभेला मदन पाटील आणि विधानसभेला संभाजी पवार यांना उमेदवारी मिळाली. मदन पाटील आणि संभाजी पवार दोघेही पराभूत झाले.

 

 

 

पाच वर्षानंतर 2004 मध्ये पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुका लागल्या. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची युती झाली. सांगलीची जागा काँग्रेसचे विद्यमान आमदार दिनकर पाटील यांना मिळाली. येथे मदन पाटील यांनी आपल्याला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न केले परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही. उमेदवारी मिळाली नसल्याने मदन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सांगलीतील राष्ट्रवादीचे कार्यालय फोडले. मदन पाटील यांनी अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेतला. मै हुँ ना अशी हाक देत ते विधानसभेला दरवाजा फोडून निवडून आले.

यावेळी रामभाऊ घोडके आणि जगन्नाथ माने हेही अपक्ष उभे होते. येथे मदन पाटील यांनी विजय मिळविला. मदन पाटील यांना 66293, काँग्रेसच्या दिनकर पाटील यांना 36449 तर भाजपच्या संभाजी पवारांना 39708 मते मिळाली.

2004 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा आघाडीची सत्ता आली. मागच्या टर्ममधील जयंत पाटील, आर. आर. पाटील, डॉ. कदम यांनी कॅबीनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. शेवटच्या वर्षात मदन पाटील यांनाही मंत्रीपदाची संधी देण्यात आली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज