rajkiyalive

(loksabha ) हातकणंगलेत दुरंगी की तिरंगी?

विरोधी इंडिया आघाडीकडून राज्ाू शेट्टी यांना रान मोकळे ठेवण्यात आले आहे. परंतु राजू शेट्टी यांनी एकला चलोरेची भूमिका घेतली आहे. तसे झाले तर ऐनवेळी जयंत पाटील यांचे चिरंजिव प्रतिक पाटील यांना मैदातान उतरावे लागेल आणि तिरंगी लढत होईल हे मात्र नक्की.

 

 दिनेशकुमार ऐतवडे

 

(loksabha 2024 ) हातकणंगलेत दुरंगी की तिरंगी?

 

येणार्‍या महिनाभरात लोकसभेची निवडणूक केव्हांही लागू शकते. त्या अनुषंगाने सर्वच पक्षांची उमेदवारीसाठी लगबग सुरू झाली आहे. महाराष्ट्रात भाजप मिशन 45 प्लस घेवून वाटचाल करताना दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक मतदार संघावर भाजपची करडी नजर आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले लोकसभा मतदार संघ ही त्यापैकीच एक आहे. येथे सध्या शिंदे खटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यामुळे महायुतीकडून त्यांची उमेदवारी पक्की आहे. ते आता शिवसेनेच्या तिकीटवार लढतात की भाजपच्या चिन्हावर ते निवडणुकीतच कळेल.

 

 

 

सध्या सर्वच पक्षात जागा वाटपाची जाहिरात जोरदार सरू आहे.

महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा समावेश आहे. अजित पवार हेही नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी सरसावले आहेत. त्यासाठी उमेदवारी देताना तोलून मोलूनच उमेदवारी देण्यात येणार आहे. महायुतीतर्फे सध्या तरी विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी पक्की आहे. नुकताच त्यांनी आपला वाढदिवस जोरदार आणि धुमधडाक्यात साजरा करून आपणही काही कमी नाही, हे दाखवून दिले आहे.

चांद्यापासून बांद्यापर्यंत त्यांनी शिवसेना शिंदे गट मजबूत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. संपूर्ण मतदार संघात गेल्या पाच वर्षात 8200 कोटीची विकासकामे केल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत जनता पुन्हा मला खासदार करेल असे त्यांचे म्हणणे आहे.

राजू शेट्टींनी जोरदार पायाला भिंगरी लावली आहे.

दुसरीकडे 2009 मध्ये स्वतंत्र आणि 2014 मध्ये भाजप आघाडीच्या मदतीने निवडून आलेल्या राजू शेट्टींनी जोरदार पायाला भिंगरी लावली आहे. 22 दिवस पदयात्रेच्या निमित्ताने त्यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला. यंदाच्या उसाला पहिला हप्ता 3500 आणि गेल्या हंगामातील उसाला अतिरिक्त 400 रूपये द्यावे अशी त्यांची मागणी होती. कोल्हापूर जिल्ह्यात त्यांच्या आंदोलनाला चांगले यश मिळाले. बहुतांश कारखान्यांनी त्यांच्या मागणीला दुजोरा देवून दर देण्याची घोषणा केली. परंतु सांगली जिल्ह्यातील त्यांचे आंदोलन मात्र काहीसे मागे पडले. परंतु त्यांनी मागे न हटता आपली मागणी रेटून धरली आहे. सांगली जिल्ह्यातील प्रत्येक साखर कारखान्याच्या गेटवर त्यांनी जावून ठिय्या मांडला. शेतकर्‍यांना योग्य दर मिळेपयंर्ंत आपली लढाई चालूच राहणार आहे, असा त्यांचा दावा आहे. त्यादृष्टीने त्यांनी वाटचालही सुरू ठेवली आहे.

ऐनवेळच्या पैलवानांना लोकसभेचे स्वप्न…

इंडिग आघाडी आणि भाजप आघाडी यांना समान अंतरावर

लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी इंडिग आघाडी आणि भाजप आघाडी यांना समान अंतरावर ठेवले आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण स्वतंत्र लढणार असे त्यांनी ठरविले आहे. परंतु वंचित आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राजू शेट्टी यांना इंडिया आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. भाजपला शह द्यायचा असेल तर एकास एक लढत दिली पाहिजे असे त्यांचे मत आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांना इंडिया आघाडीत घेण्यासाठी ते प्रयत्नशिल आहेत. इंडिया आघाडीही सध्याच्या घडीला हातकणंगले राजू शेट्टींच्या वाटणीला सोडली आहे.

तोडीला तोड उमेदवार म्हणून आ. जयंत पाटील यांचे पूत्र प्रतिक पाटील

राजू शेट्टी यांनी शेवच्या क्षणाला जर आपली भूमिका कायम ठेवली तर मात्र इंडिया आघाडीला या मतदार संघात आपला उमेदवार देण्यासाठी तयारी करावी लागणार आहे. सध्यातरी त्यांच्या तोडीला तोड उमेदवार म्हणून आ. जयंत पाटील यांचे पूत्र प्रतिक पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे. आ. जयंत पाटील यांचे सर्वच पक्षात मित्र आहेत. शिराळा, इस्लामपूर हे विधानसभा मतदार संघावर त्यांची पकड आहे. शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी, शाहूवाडी पन्हाळा या मतदार संघातही जयंत पाटील यांचा गट काहीअंशी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत इंचलकरंजी विधानसभा मतदार संघात राजू शेट्टी 75 हजार मताधिक्क्याने मागे पडले होते. आणि तेथेचे त्यांचा पराभव निश्चित झाला होता.

राहूल आवाडे हेही लोकसभेसाठी इच्छुक

सध्या इचलकरंजी विधानसभा मतदार संघात आ. प्रकाश आवाडे हे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांचे पूत्र राहूल आवाडे हेही लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांची समजूत भाजपला काढावी लागणार आहे. त्यांची समजूत निघाली तर भाजपला काही तेथे अडचण येणार नाही परंतु ते जर नाराज राहिले तर मात्र भाजपला तेथे कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्याचा फायदा प्रतिक पाटील यांना होवू शकतो.

निवडणुकीच्या दरम्यान अजून कोणकोणते मुद्दे पुढे येतात?

शिरोळ मतदार संघातही जोरदार तिरंगी लढत होवू शकते. शिरोळ हा जरी राजू शेट्टींंचा होम ग्राउंड असला तरी अनेक शत्रू त्यांनी निर्माण करून ठेवले आहेत. त्यामुळे येथे राजू शेट्टींना जोरदार तयारी करावी लागणार आहे. केवळ शेतकरी आणि उसदर घेवून आपण निवडणूक जिंकू शकतो हा त्यांचा दावा फोल ठरू शकतो. कारण निवडणुकीच्या दरम्यान अजून कोणकोणते मुद्दे पुढे येतात हे काळच ठरविणार आहे.

ऐनवेळी प्रतिक पाटील यांचे नाव पुढे?

एकंदरीत विद्यमान खासदार धैर्यशील माने आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपण निवडणुकीत उभे राहणार हे नक्की असून, त्या दृष्टीने प्रचार यंत्रना राबविण्यास सुरूवात केली आहे. इंडिया आघाडीकडून अजून उमेदवारीची चर्चा नसली तरी ऐनवेळी प्रतिक पाटील यांचे नाव पुढे करून जोरदार बॉम्ब टाकण्याच्या तयारीत इंडिया आघाडी असेल. जयंत पाटील यांनीही बारीक तयारीला लागले आहेत.

जयंत पाटील यांनाही आपली ताकद दाखविण्याची चांगली संधी

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद सांभाळणार्‍या जयंत पाटील यांनाही आपली ताकद दाखविण्याची चांगली संधी आली आहे. राजकारणात मुरलेल्या जयंत पाटील हे संधी सोडतील असे वाटत नाही. शेवटी राजकारणात काहीही होवू शकते सध्या तरी हातकणंगले लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत होईल, असे वाटते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज