almatti news : सांगली, कोल्हापुरचा महापूर अलमट्टीच्या फुगवटीने नव्हे : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरास अलमट्टी धरणाचा फुगवटा कारणीभूत नसून राज्य सरकारने महापूर नियंत्रणासाठी पूर्ण नियोजन केले आहे. आगामी काळात सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला महापुराची समस्या भेडसावणार नाही. 3200 कोटी रुपयांची भीमा स्थिरीकरण योजनेची कार्यवाही होईल, असे जलसंपदा मंत्र्यांनी स्पष्ट केल्याने अलमट्टीला क्लीनचिट दिल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. दरम्यान मंत्रालयातील बैठकीला विरोधी पक्षाच्या आमदार खासदारांना निमंत्रण नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
almatti news : सांगली, कोल्हापुरचा महापूर अलमट्टीच्या फुगवटीने नव्हे
राज्य सरकारकडून अलमट्टीला क्लीनचीट, जलसंपदा मंत्र्यांच्या बैठकीला विरोधकांना निमंत्रण नसल्याचे नाराजी
मुंबईत जलसपंदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात बैठक घेण्यात आली. यावेळी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, आ. अरुण लाड, आ. सुधीर गाडगीळ, आ. सत्यजित देशमुख, आ. गोपीचंद पडळकर, आ. सुहास बाबर, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी माजी आ. उल्हास पाटील, आ. प्रकाश आवाडे, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, कृष्णा महापूर समितीचे सर्जेराव पाटील, दिपक पाटील, नागेश काळे, डॉ. अभिषेक दिवाण, दिनकर पवार, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील यांच्यासह उपस्थित होते.
कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढविण्याचा निर्णय घेतल्याने सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना महापुराचा धोका आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहेत. त्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकप्रतिनिधी, जलसंपदा विभाग आणि या विषयावर आंदोलन करणार्या संघटनांची बैठक घेतली.
बैठकीमध्ये वडनेरे समितीच्या शिफारशी राज्य सरकारने स्वीकारल्या आहेत. सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराला अलमट्टी धरणातील पाण्याची फुग कारणीभूत नसल्याचा स्पष्ट अहवाल त्यांनी दिला आहे. त्या अनुषंगाने महापौर नियंत्रणासाठी 3200 कोटींची महत्त्वकांक्षी योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचे संकट कायमचे बंद होईल. दुष्काळी भागासह विदर्भ मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्नही निकालात निघणार आहे. त्यामुळे या योजनेला विरोध न करता सर्वांनी सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी, असे मत बैठकीत मंत्र्यांनी मांडले. तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही हीच भूमिका घेतली. महापूर नियंत्रणासाठी सर्व नियोजन राज्य शासनाने केली असल्याचे बैठकीत शासनामार्फत सांगण्यात आले.
almatti-news-sangli-kolhapur-floods-not-due-to-almatti-swelling
आमदार अरुण लाड आणि माजी आमदार उल्हास पाटील यांनी अलमट्टी धरणातील पाणी साठ्यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावाला महापुराचा धोका वाढतो. हे आम्ही आजपर्यंतच्या प्रत्येक महापुरा वेळी भोगले वडनेरे समितीच्या शिफारशी चुकीच्या असल्याने त्यावर फेरविचार करावा आणि पुन्हा दुसरी समिती नियुक्त करावी, अशी मागणी केली. त्यावर राज्य सरकारने या समितीच्या शिफारशी स्वीकारल्या आहेत तसेच आंध्र आणि तेलंगाना बरोबर सर्वोच्च न्यायालयात याची काही दाखल केली असल्याचे सांगण्यात आले. विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीसह येत्या काही दिवसात पुन्हा या संदर्भात बैठक घेण्यात येणार असल्याचे जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.
तर आंदोलनाची तीव्रता वाढवू ः सतेज पाटील
मुंबईतील बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलावले नसल्याने माजी मंत्री सतेज पाटील हे बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी बैठक संपल्यावर मंत्रालयाबाहेर संघर्ष समितीच्या सदस्यांसोबत चर्चा करून सरकारची भूमिका चुकीची असल्याचे सांगितले. या महापुरास अलमट्टीच जबाबदार असून या धरणाची उंची वाढवून दिली जाणार नाही. सरकारने उंची वाढीला कायदेशीर विरोध न केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.