kasbe digraj crime news : कसबे डिग्रजममध्ये गाडी पार्किंगच्या वादातून तरुणास लोखंडी रॉडने मारहाण

SHARE:

kasbe digraj crime news : कसबे डिग्रजममध्ये गाडी पार्किंगच्या वादातून तरुणास लोखंडी रॉडने मारहाण : सांगली : मिरज तालुक्यातील कसबेडिग्रज गावामध्ये ओमनी गाडी आणि पिकअपच्या पार्किंगवरून दोन तरुणात राडा झाला. चारचाकी व्यवस्थित लावली नसल्याचा आरोप करीत एकाने युवकास शिवीगाळ करीत लोखंडी रॉडने मारहाण करुन चारचाकीची काच फोडली. सदरची घटना हि सोमवार दि. 19 रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडली.

kasbe digraj crime news : कसबे डिग्रजममध्ये गाडी पार्किंगच्या वादातून तरुणास लोखंडी रॉडने मारहाण

या प्रकरणी जखमी शाहिद अस्लम फकीर (वय 20, रा. कसबे डिग्रज) याने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणार्‍या सुमित सुनील पाटील (वय 22 रा. कसबेडिग्रज) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, जखमी शाहिद फकीर हे सायंकाळच्या सुमारास त्यांच्या घरासमोर थांबले होते. त्यावेळी त्यांच्याच गल्लीतील संशयित सुमित सुनील पाटील (वय 22, रा. कोळीवाडी, कसबे डिग्रज) हा तेथे आला. शाहिद याने त्याच्या मालकीची चारचाकी (क्र. एमएच 10 के 0564) रस्त्याकडेला लावली होती.

kasbe-digraj-crime-news-youth-beaten-with-iron-rod-over-parking-dispute-in-kasbe-digraj

संशयित सुमित पाटील याने शाहिद यास चारचाकी व्यवस्थित का लावली नाही याचा जाब विचारला तसेच त्यास शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यानंतर त्याने त्याच्या वाहनातून लोखंडी रॉड आणून शाहिद याच्या मनगटावर मारहाण केली. भांडण सोडविण्यास शाहिद याचे आई – वडिल आले असता त्यांनाही दमदाटी केली. तसेच शाहिद याच्या चारचाकीची काच फोडून नुकसान केले. पोलिसांनी संशयित सुमित पाटील याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *