rajkiyalive

अल्पवयीन मुलीवर अत्याचार : नराधम तरुणास दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार : नराधम तरुणास दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा.: सांगली : शहरातील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्यावर पुण्यातील नारायणगाव येथे नेऊन लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधम तरुणास न्यायालयाने दोषी धरून दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आसित रमजान मुजावर (वय 22 रा. वानलेसवाडी) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. जिल्हा व जादा सह सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी सदरची शिक्षा सुनावली. हि घटना सप्टेंबर 2019 रोजी घडली होती.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार : नराधम तरुणास दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा.

याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी आसित मुजावर याने शहरातील एका परिसरात राहणार्‍या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. पीडित तरुणीच्या आईने दि. 09 सप्टेंबर 2019 रोजी याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा शोध घेतला असता पीडित मुलगी हि शहरातच एकाठिकाणी मिळून आली. यावेळी तिच्या आईने पीडितेला विश्वासात घेऊन चौकशी केली असता पीडितेने सांगितले कि, आरोपी आसित मुजावर याने पीडितेला पुण्यातील नारायणगाव येथे एका घरी नेऊन त्याठिकाणी तिच्यावर इच्छेविरोधात जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्याचे नमूद केले.

पीडित मुलगी हि अल्पवयीन आहे हे माहित असून देखील आरोपीने सदरचे कृत्य केले. घडलेला प्रकार माहित झाल्यानंतर पीडितेच्या आईने पुन्हा विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तत्कालीन पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी तपास केला. घटनास्थळाचा पंचनामा, पीडितेच्या आईचा आणि पीडितेचा जबाब नोंदवला. इतर तपास टिप्पणे नोंदवून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. यावेळी सरकारी पक्षातर्फे एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले.

साक्षीदारांच्या साक्षीचा विचार करून न्यायालयाने आरोपी आसित मुजावर याला दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्यात पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, कॉन्स्टेबल सनी मोहिते, इम्रान महालकारी, पेरावी कक्षातील सुनीता आवळे, श्रीमती रेखा खोत यांचे सहकार्य मिळाले. याकामी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील आरती देशपांडे-साटविलकर यांनी काम पाहिले.

——————————–

सांगलीतील पंचशीलनगर मध्ये घरफोडी : सोन्याचे दागिने, रोकड लंपास.

सांगली : शहरातील जुना बुधगाव रोडवर असणार्‍या पंचशीलनगर मधील बंद घरफोडून चोरटयांनी घरफोडी केली. कुटुंबीय यात्रेसाठी गावी गेले असताना घराच्या मागील दरवाजाची कडी काढून आत प्रवेश करत चोरटयांनी सोन्याच्या दागिन्यांसह 95 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सदर चोरीची घटना हि रविवार दि. 28 एप्रिल रोजी सकाळी सव्वा आठ ते दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी मारुती सुरेश गलांडे (वय 22 रा. सांगली) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी मारुती गलांडे हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील जुना बुधगाव रोडवरील पंचशीलनगर मध्ये राहतात. रविवार दि. 28 एप्रिल रोजी त्यांच्या मूळ गावी जत तालुक्यातील डोर्ली या गावची जत्रा असल्याने त्यांच्या आई लक्ष्मी गलांडे यांच्या सोबत गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्याने सकाळी सव्वा आठ ते दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घराच्या एका खोलीस आतून घातलेली कडी काशानेतरी काढून घरात प्रवेश केला.

घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले दोन सोन्याच्या अंगठ्या आणि 20 हजार रुपये असा एकूण 95 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केले. दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास गलांडे हे घरी परतले असता त्यांना सदर चोरीचा प्रकार निदर्शनास आला. यानंतर त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून शहर विभागाचे उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज