कुपवाड एमआयडीसीमधील घटना : खुनाचे कारण अस्पष्ट
bhose murdar news : भोसेतील तरुणाचा कुपवाड येथे निर्घृण खून : कुपवाड: एम आय डी सी मधील सह्याद्री स्टार्च कारखान्याच्या पाठीमागे शिवशक्तीनगर येथे रविवारी मध्यरात्री एका तरुणाचा धार धार शस्त्राने भोकसून निर्घृण खून झाल्याची घटना घडली. डोक्यावर व छातीवर वर्मी घाव बसल्याने तरुण गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे पाहून हल्लेखोर पसार झाले.श्रवणेशनाथ महावीर चौगुले (वय 29 सध्या रा. सिद्धिविनायक पार्क शिवशक्तीनगर एम आय डी सी कुपवाड, मूळ भोसे ता. मिरज) असे मयत तरुणाचे नाव आहे.
bhose murdar news : भोसेतील तरुणाचा कुपवाड येथे निर्घृण खून
याबाबत उमेश आप्पासाहेब पाटील यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली. सोफ्या (पूर्ण नाव माहिती नाही) अशोक मोरे (पूर्ण नाव माहिती नाही) अशी गुन्हा नोंद करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत श्रवणेशनाथ चौगुले हा एम आय डी सी मधील शिवशक्तीनगर मधील सिद्धिविनायक पार्क येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. तो ड्रायव्हिंगचे काम करीत होता. काही दिवसांपूर्वीच दोघेजण मित्र त्या ठिकाणी राहायला आले होते. रविवारी रात्री खोलीत मयत श्रवणेशनाथ मित्रांसमवेत बसला असताना त्याला अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने डोक्यात व छातीवर वर्मी घाव करून जखमी केले. तो रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडल्याचे दिसताच संशयितांनी पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा.पो.नि.दीपक भांडवलकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने गंभीर जखमीस मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले.
bhose-murdar-news-brutal-murder-of-a-young-man-from-bhose-in-kupwad
खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक संदीप घुगे,पोलिस उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सतीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.व तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या.
संशयितांच्या शोधासाठी पोलिसांचे पथके रवाना करण्यात आली आहेत.अधिक तपास पोलीस उपनिरिक्षिक गाडवे करीत आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.