rajkiyalive

vishal patil news : भाजपने दादा घराण्यातदेखील फूट पाडली : खा. विशाल पाटील

vishal patil news : भाजपने दादा घराण्यातदेखील फूट पाडली : खा. विशाल पाटील : आमच्या वहिनींचा प्रवेश घेऊन भाजपने आमच्या घरात देखील फूट पाडली. मला देखील पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील दररोज भाषणात ऑफर देतात, पण भाजपच्या दोन टर्म निवडून आलेल्या खासदाराला पाडून अपक्ष निवडून आलो आहे. मी लोकांना सांगितले की, मी अपक्ष असलो तरी काँग्रेसच्या विचाराचा आहे, म्हणून मी निवडून आला. आता जे लोक सोडून जात असतील त्यांना निश्चित पश्चाताप होईल, असे मत खा. विशाल पाटील यांनी व्यक्त केले.

vishal patil news : भाजपने दादा घराण्यातदेखील फूट पाडली : खा. विशाल पाटील

अक्कलकोट (जि.सोलापूर) येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खा. विशाल पाटील बोलत होते. यावेळी माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, खा. प्रणिती शिंदे आदी उपस्थित होते. खा. विशाल पाटील म्हणाले, आमच्या घरात सुद्धा भारतीय जनता पक्षाने फुट पाडली आहे. आमच्या घरात फुट पाडण्यासाठी आमच्या एका वहिनींचा भाजपने प्रवेश करुन घेतला. आमचे पालकमंत्री रोज भाषण करतात की विशाल पाटलांना आम्ही घेणार आहे. अहो, मी अपक्ष निवडून आलो. भाजपच्या दोन टर्म निवडून आलेल्या खासदाराला पाडून अपक्ष निवडून आलो. मी लोकांना सांगितलं की, मी अपक्ष असलो तरी काँग्रेसच्या विचाराचा आहे, म्हणून मी निवडून आलो.

काँग्रेसचा विचार सहजासहजी दाबता येत नाही. महाराष्ट्रात एकमेव अपक्ष खासदार निवडून आला, पण तो काँग्रेसच्या विचाराचा निवडून आला. काही व्हायचे आहे ते होऊ दे, आम्हाला तुरुंगात जायला लागेल, अडचणीत यायला लागेल तरी दहा-वीस विशाल पाटील तुमच्यातून तयार होतील. थांबण्याची आमची क्षमता आहे. चूक केली असेल तर धाडसाने सामोरे जाण्याची गरज होती. कार्यकर्त्यांना स्वत:च्या संस्था बळकट करण्यासाठी लोक सोडून जात असतील, तर त्यांना निश्चित पश्चाताप होणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसचा विचार मजबूत आहे. मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते सामान्याला नेता बनवू शकतात.

हेही आवर्जुन वाचा

जयश्रीताईंच्या प्रवेशामुळे अनेक प्रभागात होणार भाजपची गोची

सत्तेची साखळी की संघर्षाचा धूर? सांगलीवाडीच्या राजकारणात नवा रंग

शिवाजीराव नाईक : शेवटचा अध्याय, की नव्या युगाची सुरुवात?

भाजप सरकारने महाराष्ट्र कसा लुटायचा यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र महाराष्ट्राला लाचार करण्याचे काम दिल्लीवाल्यांनी केले आहे. दिल्लीचेही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा, एवढी ताकत महाराष्ट्रात आहे. तर दिल्लीत रोज काहीतरी चालू आहे, काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान म्हणून दिल्लीत बसणार हा दिवस लांब नाही. त्यानंतर गेलेले सगळे म्हणतील आम्हाला घ्या, आम्हाला घ्या त्यावेळी घ्यायचं का? असा सवाल देखील खा. विशाल पाटील यांनी उपस्थित केला.

शक्तिपीठच्या माध्यमातून पैसे खाण्याचा उद्योग..
राज्यातील शेतकर्‍यांचा शक्तिपीठ महामार्गाला विरोध आहे. पण शक्तिपीठ महामार्गात जास्तीत जास्त कसा पैसा खाता येईल, एवढाच उपयोग महाराष्ट्राचा चालला आहे. तुमच्या खिशात थोडे टाकायचे आणि इथून भरभरून घ्यायचे आणि देशभरावर महाराष्ट्राच्या जीवावर राज्य करायचे, हा भाजपचा डाव असल्याची टीका खा. विशाल पाटील यांनी केली.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज