chandrakant patil on vishal patil : विशाल पाटील कसे जिंकले हे सांगू शकत नाही

SHARE:

chandrakant patil on vishal patil : विशाल पाटील कसे जिंकले हे सांगू शकत नाही : लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील हे कसे विजयी झाले. हे मी जाहीरपणे सांगू शकत नाही. लोकसभेतील विजय ही विशाल पाटलांसाठी लॉटरी होती, असे सूचक वक्तव्य भाजप नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केले. भाजपने वसंतदादा पाटील यांचे घर फोडले, या आरोपातही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

chandrakant patil on vishal patil : विशाल पाटील कसे जिंकले हे सांगू शकत नाही

वसंतदादांचे घर फोडले, यात तथ्य नाही ः चंद्रकांतदादा पाटील

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, विशाल पाटील लोकसभेला कसे निवडून आले, हे मी काही जाहीरपणे सांगू शकत नाही. ती लॉटरी होती. त्यांची ताकदच होती, तर मग लोकसभेच्या मागच्या निवडणुकीत ते का विजयी झाले नाहीत. प्रत्येक वेळी परिस्थिती बदलते. यावेळी बदलली. त्यांना अनुकूल झाली. ते विजयी झाले. पण आता मी अपक्ष खासदार झालो म्हणजे मी राजा झालो, अशी भावना त्यांच्यात तयार झाली आहे. ते सर्वच विषयात टिपणी करू लागले आहेत.

ना. पाटील म्हणाले, काँग्रेसनेच त्यांना पक्षातून काढले. बाकीच्या ठिकाणी निवडणुका झाल्या की बंडखोर उमेदवाराला महिन्यात परत पक्षात घेतले जाते. पण जयश्री पाटील यांना काँग्रेसमध्ये परत घेण्याचे नाव घेईनात. विधानसभा निवडणुकीला काँग्रेसच्या उमेदवारीवर त्यांचाच दावा होता. पण पक्षाने तो डावलला. या सर्व पार्श्वभूमीवर जयश्री पाटील यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. विशाल पाटील यांचा दावा आहे का, की ते भविष्यात भाजपमध्ये येणार नाहीत.

कार्यकर्त्यांच्या घरी जाणे, कुटुंबातील सदस्यांची ओळख करून घेणे, त्यांच्या सुख, दु:खाविषयी चर्चा करणे ही भाजपची कार्यपद्धती आहे. त्यानुसार मी दौर्‍यावर आलो की कार्यकर्त्यांच्या घरी जातो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
भोंग्याच्या आवाजाबाबत न्यायालयाने निर्णय दिलेले आहेत. शासनाने नियम केलेले आहेत. त्याचे पालन होणे गरजेचे आहे. हिंदू व मुस्लिम यांच्यातील काही विषय हे बसून सामंजस्याने सोडविण्याचे आहेत. दरवेळी त्यात राजकारण आणणे योग्य नाही, असे उत्तर मंत्री पाटील यांनी एका प्रश्नावर दिले.

हेही आवर्जुन वाचा

जयश्रीताईंच्या प्रवेशामुळे अनेक प्रभागात होणार भाजपची गोची

सत्तेची साखळी की संघर्षाचा धूर? सांगलीवाडीच्या राजकारणात नवा रंग

शिवाजीराव नाईक : शेवटचा अध्याय, की नव्या युगाची सुरुवात?

भाजपने दादा घराण्यातदेखील फूट पाडली : खा. विशाल पाटील

केंद्र शासनाचा तीन भाषा शिकवण्याचा प्रस्ताव आहे. हिंदी या विषयाची सक्ती केलेली नाही. हिंदी सक्तीवरून केवळ भुई थोपटण्याचे काम चालले आहे. देशाच्या निम्म्याहून अधिक भागात हिंदी भाषा वापरली जाते. त्यामुळे हिंदी शिकणे चांगलेच आहे. मराठी भाषेवरून राजकारण करणार्‍यांची मुले कोणत्या शाळेत, कोणत्या माध्यमात शिकताहेत हे जाहीर करावे, असे आव्हानही मंत्री पाटील यांनी दिले.

chandrakant-patil-on-vishal-patil-cant-say-how-vishal-patil-won

ठाकरे शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीतील पराभव समोर दिसत आहे. मुंबईतील शिवसेनेचे 75 नगरसेवक शिंदे शिवसेनेत गेले आहेत. ठाकरे सेनेला आता नव्याने उमेदवार शोधावे लागणार आहेत. त्यामुळे त्यांना आता राज ठाकरे यांची आठवण झाली आहे. उध्दव ठाकरे व राज ठाकरे हे दोघे एकत्र आल्यावर भाजपची व्यूहरचना ठरेल, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

जयश्रीताईंचा पक्षप्रवेश भाजपच्या प्रभावाखाली नाही
जयश्रीताई पाटील या वयाने लहान नाहीत की, कोणीतरी चुकीचे मार्गदर्शन केले. अन् त्यांनी निर्णय घेतला, असे काहीही झाले नाही. त्यांनी खूप दिवस विचारमंथन केले. कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला. खासदार विशाल पाटील यांना वाटते की जयश्रीवहिनींना काही कळत नाही. भाजपच्या प्रभावाखाली त्यांनी निर्णय घेतला. मात्र तसे काही झाले नाही. भाजपच्या प्रभावाखाली त्यांनी पक्षप्रवेश केलेला नसल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *