budhgaon crime news : बुधगाव एटीएम चोरी प्रकरणात हरियाणाच्या टोळीचा हात? : सांगली : बुधगाव येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरट्यांनी 17 लाख 34 हजार रुपयांची रोकड लंपास केली. या चोरीमागे हरियाणातील टोळीचा हात असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. रत्नागिरी- नागपूर महामार्गावरील टोलनाके चुकवित चोरटे सोलापूरच्या दिशेने पसार झाले आहेत. दरम्यान चोरट्यांकडील चारचाकी गाडीचा क्रमांक पोलिसांच्या हाती लागला असून हा क्रमांक पुण्यातील आहे. पण गाडीचा नंबर बोगस असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे.
budhgaon crime news : बुधगाव एटीएम चोरी प्रकरणात हरियाणाच्या टोळीचा हात?
बुधगाव येथील बस थांब्यानजीक बँक ऑफ इंडीयाचे एटीएम केंद्र आहे. या केंद्रातील मशीनमध्ये चार दिवसांपूर्वीच वीस लाख रोकड भरली होती. बुधवार दि. 21 रोजी पहाटे पाचच्या सुमारास चारचाकी गाडीतून चोरटे आले. त्यांनी चेहर्यावर काळा मास्क लावला होता. एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षक नव्हता. सीसीटीव्हीवर काळा रंग स्प्रेने फासला. त्यानंतर एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून 17 लाख 34 हजार 400 रुपये रोकड अवघ्या काही मिनिटांत पळविली. चोरट्याची एटीएम केंद्रावर प्रवेश केल्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते.
सीसीटीव्हीत दोन चोरटे एटीएम केंद्रात शिरल्याचे तर एकजण चारचाकी गाडीत असल्याचे दिसून येते. या चोरीमागे हरियाणातील टोळीचा हात असल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला. यड्राव येथील चोरीमागेही हीच टोळी असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. बुधगाव येथील चोरीनंतर चोरटे कुमटे फाटा येथून सावळज, मणेराजुरीमागे शिरढोणपर्यंत गेले. सोलापूरच्या दिशेने जाताना चोरट्याने टोलनाके चुकविल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांच्या शोधासाठी सांगली ग्रामीण पोलिसांसह एलसीबीची चार स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहे.
budhgaon-crime-news-haryana-gang-involved-in-budhgaon-atm-theft-case
चोरट्याच्या चारचाकी गाडीचा क्रमांक पुण्यातील आहे. पण तोही बोगस असावा, अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक किरण चौगले, सहाय्यक फौजदार मेघराज रुपनर करीत आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.