rajkiyalive

dudhgaon news : दुधगावमध्ये पंचकल्याण महोत्सवाची जय्यत तयारी

dudhgaon news : दुधगावमध्ये पंचकल्याण महोत्सवाची जय्यत तयारी : मिरज तालुक्यातील दुधगाव येथे रविवार 4 मे पासून सुरू होणार्‍या पंचकल्याण महामहोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. खोची रस्त्याला भव्य आणि दिव्य मंडप उभारण्यात आले असून, बाजूसच 30 स्टॉल आणि भव्य असे भोजनगृहाची उभारणी करण्यात आल्याची माहिती पूजा कमिटीचे अध्यक्ष आडमुठे आणि उपाध्यक्ष भरत साजणे यांनी दिली. यावेळी पूजा कमिटीचे सर्व सदस्य आणि मंदिर कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

dudhgaon news : दुधगावमध्ये पंचकल्याण महोत्सवाची जय्यत तयारी

मिरज तालुक्यातील दुधगाव येथील श्री 1008 पार्श्वनाथ जिनमंदिरतर्फे 4 मे ते 10 मे 2025 अखेर पंचकल्याणक पुजेचे आयोजन करण्यात आले आहे. दुधगाव येथील आप्पासो बाळगोंडा पाटील धावते यांना यजमानपदाचा मान मिळाला आहे.
दुधगावमध्ये अनेक वर्षानंतर पंचकल्याण पुजेचे आयोजन करण्यात आले आहे.

या पुजेसाठी आचार्य सन्मतीसागरज महाराज यांचे परमशिष्य धर्मसागरजी महाराज, आगम चक्रवर्ती विद्यासागरजी महाराज, प्रशांतसागरजी महाराज, आगमसागरजी महाराज यांच्या आशिर्वादाने या पुजेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी सौधर्म इंद्र इंद्रायणी आप्पासो बाळगोंडा पाटील धावते, तीर्थंकर माता पिता सुरगोंडा रायगोंडा पाटील चक्रे, धनपती कुबेर श्रेणिक भरमा चौगुले, ईशान्य इंद्र शितल उल्हास आडमुठे, धर्मा, चक्रवर्ती संजय राजगोंडा पाटील खिडबिडे, महायज्ञनायक सुभाष यशवंत मगदूम, सुवर्ण सौभाग्यवती मोहन गुणधर कोले, ध्वजारोहण भरत जयकुमार साजणे, अखंड दीपस्थापना अजित आण्णा शिराळकर, मंडप उद्घाटक वसंत जिन्नाप्पा हेरवाडे, द्वादश इंद्र संदीप तात्यसो चोपडे, द्वादश इंद्र 2 बाळासाहेब दादा हेरवाडे, दवादश इंद्र 3 विद्यासागर देवेंद्र पाटील, द्वादश इंद्र 4 भूषण प्रकाश रूकडे, द्वादश इंद्र 5 अरूण बाळासो कुदळे आदींनाही पुजेचा मान मिळाला आहे.

दुधगावात सर्वत्र पूजेचे वातावरण तयार झाले असून, ठिकठिकाणी कमानी आणि बॅनर झळकत आहेत. शनिवारी विद्यासागर महाराज यांचे गावात आगमन होणार आहे. पूजेसाठी संपूर्ण गाव सज्ज झाले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज