rajkiyalive

पंधरा कारखान्यांकडे 600 कोटीची ऊसबिले थकित

जिल्ह्यात 25 लाख टन ऊसाचे गाळप, ऊस दराचा तिढा कायम

जनप्रवास । सांगली :

जिल्ह्यातील साखर कारखानेे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु झाले आहे. पंधरा कारखान्यांनी 24.98 लाख टन ऊसाचे गाळप केले असून 23.52 लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. मात्र ऊस दराचा तिढा अद्याप सुटलेला नाही या कारणांनी कारखान्यांकडून अद्याप ऊसबिले जमा करण्यात आलेली नाहीत. पंधरा कारखान्यांकडे सुमारे 600 कोटीची रुपयांची ऊसबिले थकली आहेत. ऊस गाळपास गेल्यानंतर चौदा दिवसांत बील जमा करणे बंधनकारक आहे, परंतु कारखान्यांनी ऊस दर नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.

 

 

पंधरा कारखान्यांकडे 600 कोटीची ऊसबिले थकित

जिल्ह्यातील साखर कारखाने नोव्हेंबरच्या प्रारंभीच सुरु झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचा फॉर्म्युला सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी स्वीकारण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होती, परंतु जिल्ह्यातील कारखानदार 3100 रुपये पहिली उचल देण्यावर ठाम होते. मात्र, दुष्काळ पट्ट्यातील कारखानदारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे माजी खा. राजू शेट्टी यांनी कारखानदारांची मागणी अमान्य केली. त्यामुळे संघटनेने कारखानदारांना गतवर्षीचा साखर उतारा साडेबारा टक्केपेक्षा अधिक असल्यास पहिली उचल 3250 रुपये, साडेबारा पेक्षा कमी असल्यास 3150 आणि ज्या कारखान्यांचा साखर उतारा 10 टक्के आहे. त्या कारखान्यांनी 3100 रुपये असा शेवटचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

कारखानदारांनी 3150 रुपये देण्यास सहमती दर्शवली. साडेबारा टक्के पेक्षा जास्त उतारा 3150 रुपये तर त्यापेक्षा कमी उतारा असलेल्या कारखान्यांनी 3100 देण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु स्वाभिमानीने तो अमान्य केला. मात्र स्वाभिमानीने त्यांच्या मागणीचा रेटा कायम ठेवला. त्यामुळे साखर कारखानदारांनी 26 डिसेंबरपर्यंत आम्ही निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे ऊस दरासाठी 16 डिसेंबरला झालेली तिसरी बैठकी निष्पळ ठरली होती. परंतु कारखानदारांनी गतवर्षी तुटलेल्या उसापोटी तीन हजार रुपयांपेक्षा जास्त दर दिला आहे, त्यांनी 50 रुपये व ज्या कारखान्यांनी 3000 च्या आत दिला आहे, त्याच्याकडून शंभर रुपये देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.

हेही वाचा
(raju shetti ) आंदोलन योग्य पण दिशा भरकटली…
..तर लोकसभा निवडणूक लढविणार नाही. 
शिरोळमधून स्वाभिमानीच्या आक्रोश यात्रेस उत्साहात प्रारंभ
लोकसभेसाठी शेट्टींची मशागत सुरू
आवाडेंशी दुश्मनी शेेट्टींच्या मुळावर
शेतकरी संघटना, अभावग्रस्तांचा प्रभाव
शेतकरी संघटनांना फुटीचा शाप
हातकणंगलेत महाआघाडीची भिस्त राजू शेट्टींवरच
यंदा ऊस खाणार भाव, 3500 रुपये शक्य

जिल्ह्यातील साखर कारखाने प्रतिदिन 75 हजार टन गाळप करीत आहेत. आतापर्यंत 30 लाख टन गाळप झाले. साखर कारखान्यांनी प्रत्येकी 1 लाख ते 2 लाख 75 हजार टनापर्यंत गाळप केले आहे. महिना उशीर झाल्याने 600 कोटी रुपये ऊस बिले थकली आहेत. यात सर्व कारखान्यांची मिळून 6 कोटी रुपये व्याज बचत झाली आहे. मात्र वेळेत ऊसबिले न मिळाल्याने शेतकर्‍यांच्या कर्जावरील व्याज वाढत आहे. त्यांची इतर देणी प्रलंबित असल्याने ऊस उत्पादक शेतकरी पुरता अडचणीत आला आहे.

हेही वाचा

सांगलीतून दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद

दीड महिना उलटूनही जिल्ह्यातील ऊस पुरवठादार शेतकर्‍यांना आजपर्यंत ऊसाची पहिली उचल मिळाली नाही. सर्वच कारखान्यांकडून ऊस नियंत्रण आदेश 1966’ नुसार गळितासाठी ऊस कारखान्यास दिल्यापासून 14 दिवसात शेतकर्‍यांना एफआरपी दिली पाहिजे. त्यापेक्षा उशीर केल्यास 15 टक्के व्याजासह देणे बंधनकारक आहे. त्यानुसार कारखान्यांनी व्याजासह बिले जमा करण्यास भाग पाडू, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.

जिल्ह्यात ऊसाचे गाळप व साखर उत्पादन (लाखांत)
कारखाना गाळप साखर
दत्त इंडिया 1.63 1.50
राजारामबापू 2.25 2.23
वाटेगाव 1.59 1.77
सर्वोदय 1.11 1.23
जत युनिट 0.81 0.80
हुतात्मा 1.39 1.50
सोनहिरा 2.78 2.22
क्रांती 3.04 2.44
मोहनराव शिंदे 0.86 0.81
दालमिया 1.25 1.37
यशवंत शुगर 0.23 0.19
केन अ‍ॅग्रो 1.19 1.05
उदगिरी शुगर 1.88 1.77
सदगुरू श्री श्री 2.02 1.52
श्रीपती शुगर 1.23 1.28
एकूण 24.98 23.52

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज