rajkiyalive

गोपीचंद पडळकर खानापूरमधून लढणार

निवडणूक लढवण्याची केली घोषणा ; आजी – माजी आमदारांना दिलं खुल आव्हान
प्रताप मेटकरी : जनप्रवास
     आगामी 2024 ची विधानसभा निवडणूक खानापूर विधानसभा मतदारसंघातून लढविण्याची घोषणा करत भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शड्डू ठोकला आहे. आजी – माजी आमदारांना खुल आव्हान देत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.
       खानापूर तालुक्यातील ऐनवाडी येथे तामखडी ते ऐनवाडी २० लाख रुपयांच्या रस्त्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी युवा नेते पंकज दबडे, सरपंच दाजी पवार, विजय जाधव, उपसरपंच पल्लवी पवार, शकुंतला जगदाळे, ॲड. प्रमोद भारते, ताडाचीवाडीचे सरपंच सागर पवार, पै. सत्यजित पाटील, ढवळेश्वरचे सरपंच राहुल मंडले, विष्णू तुपे, विकास गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा

संभाजी पवार गट पुन्हा रिचार्ज होणार

भाजपकडून प्रादेशिक पक्षांचे निर्मुलन

फडणवीसांचा भाजप कधी संपून जाईल सांगता येणार नाही

राजकीय आखाड्यातील पैलवान

     यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती 2024 च्या निवडणुकीत बदलायची आहे. त्यामुळे 100 टक्के ताकदीने विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. विधानसभेला काय होणार ? कसं होणार ? निवडणूक लढवणार का ? हे सगळे डोक्यातन काढून टाका एक लाख टक्के कार्यकर्त्यांच्या पाठबळावर 2024 ची निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे.
आजी – माजी आमदारांना माझं खुल आव्हान आहे, सन 1990 पासून ते मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. चारवेळा तुमच्याकडे आमदारकी आली त्यांनी मतदारसंघातल्या गावागावात केलेली कामे दाखवावीत मीही माझ्या तीन वर्षाच्या कार्यकाळातील विकासकामे दाखवतो. माझे आजी माजी दोन्ही आमदारांना चॅलेंज आहे, मी तीन वर्षात केलेली कामे त्यांना चाळीस वर्षात करता आलेली नाहीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना टेंभू योजनेच्या चौथ्या व पाचव्या टप्प्यासाठी मी पाठपुरावा केला होता. पाठपुरावा करूनही श्रेय घ्यायला दुसरेच पुढे आले आहेत.

हेही वाचा

राजकीय आखाड्यातील पैलवान

आम्हाला कुणावर अन्याय करायचा नाही मात्र आमच्यावर कोण अन्याय करत असेल तर सहन करणार नाही. गावागावात परिस्थिती बदलली असून भाजपचा मतदार वाढला आहे. त्यामुळेच येत्या २०२४ ची निवडणूक मी लढवणार असून ती ताकदीने लढवून जिंकणार आहे. सर्वसामान्य लोकांची मागणी असल्याने मी हा निर्णय घेतला आहे. खानापूर तालुक्यातील गावागावात विकासकामांसाठी मोठा निधी प्राप्त होत आहे. काही दिवसात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनेक कामे मंजूर करून घेणार आहे. मागील वर्षी माझा निधी जत तालुक्याला दिला होता यावर्षी तो खानापूर तालुक्याला देणार आहे. त्यामुळे खानापूर घाटमाथ्यावरील गावांना निधी कमी पडणार नाही.
   ते पुढे म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीत ज्या गावांना सहकार्य करण्याचा शब्द दिला होता. तो शब्द पुर्ण करण्याची जबाबदारी घेवून त्या गावांना निधी उपलब्ध करुन दिला आहे. विकासकामात कोणतेही गाव वंचित राहू नये यासाठी त्या गावच्या पदाधिकाऱ्यांना गावचा विकास आराखडा तयार करण्याची सूचना केली होती. त्यानुसार गावागावात विकासाची कामे होत असून पाच वर्षांत ती सर्व कामे पुर्ण केली जातील. राज्यात आपल्या विचाराचे सरकार असल्याने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत आहे.
मी तीन वर्षात केलेली कामे आजी – माजी आमदारांच्यापेक्षा जास्त आहेत. १९९० पासून त्यांनी नुसते राजकारणच केले आहे. त्यांच्यासारखे टगेगिरीचे राजकारण आम्ही कधीच केलेले नाही. टेंभू योजनेवर किती दिवस राजकारण करणार आहात, असा सवाल उपस्थित केला.  यावेळी प्रदीप पवार, आण्णासो पवार, मोहन पवार, सचिन पवार, विष्णू पवार, आत्माराम जाधव, नवनाथ जगदाळे, अभिजित नांगरे पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
मतदारसंघातील राजकीय वातावरण बनले “हाय व्होल्टेज”
 राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे राजकीयदृष्टया संवेदनशील असणाऱ्या खानापूर विधानसभा मतदारसंघात देखील राजकीय भूकंप घडण्याचे संकेत मिळत होते. माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मुंबईत भेट घेऊन अजितदादा गटात प्रवेश केला. वैभवदादांच्या राजकीय भूकंप घडविणाऱ्या भूमिकेमुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले असतानाच भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शड्डू ठोकत आगामी 2024 ची विधानसभा निवडणुक खानापूर विधानसभा मतदारसंघातून लढविण्याची घोषणा केली. त्यामुळे  खानापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण हाय व्होल्टेज बनले आहे
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज