rajkiyalive

hatkanagle loksabha : शिंदे गटाला कमळाचाच पर्याय?

hatkanagle loksabha : शिंदे गटाला कमळाचाच पर्याय?
जनप्रवास । दिनेशकुमार ऐतवडे

hatkanagle loksabha : शिंदे गटाला कमळाचाच पर्याय? 22 जानेवारी रोजी रामजन्मभूमीमध्ये राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर लोकसभेचे रणशिंग केव्हाही फुुंकले जाण्याची शक्यता आहे. महिना दिड महिन्याच्या कालावधीत राज्यातील सत्ता संघर्षाचा पेच सुटणार नाही, हे निश्चित आहे.

 

hatkanagle : शिंदे गटाला कमळाचाच पर्याय?

त्यामुळे आगामी निवडणुकीत निदान लोकसभेला तरी शिंदे गटातील उमेदवारांना ऐनवेळी कमळावर लढावे लागणार आहे, यात शंका नाही. परंतु कमळावर लढण्यासाठी शिंदे गटातील बहुतांश खासदार तयार होतील यातही काही शंका नाही.
हातकणंगले, कोल्हापूर लोकसभा, शिरोळ, इस्लामपूर या विधानसभा मतदार संघात शिंदे गटासमोर चिन्हांची मोठी अडचण निर्माण होणार आहे. कोर्टाचा निकाल लवकर लागला तर ठिक नाहीतर ऐनवेळी येथे भाजप शिवसेनेचे उमेदवार देवून कमळ चिन्हावर लढा, असा आदेश देण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि हातकणंगले हे दोन महत्वाचे लोकसभा मतदार संघ 

या दोन्ही मतदार संघात सध्या शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत. कोल्हापूरात संजय मंडलिकांनी बलाढ्य धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांच्या मदतीने पराभव केला. हातकणंगलेमध्ये ऐनवेळी हातात शिवबंधन बांधून धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांची हॅट्रीक चुकवली. गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.

 

भाजप सोडून इतर सर्वच पक्षात निराशेचे वातावरण आहे.

शिंदे गट आणि ठाकरे गटात चिन्हावरून न्यायालयात लढाई सुरू आहे. राष्ट्रवादीचेही तुकडे पडले आहेत. याचा फटका विद्यमानांना तर बसणार आहेच परंतु विरोधकांनाही त्याचा फार काही फायदा होईल असे वाटत नाही. कारण शिंदे गटाला जर धनुष्यबाण चिन्ह मिळाले नाही तर भाजप शेवटच्या टप्यात आपला कार्यक्रम करेल आणि उमेदवारांना कमळ चिन्हावर लढण्याशिवाय पर्याय राहणार नाही. अशी शक्यता भाजप जाणुनबुजूनही आणू शकते.

कोल्हापूरमध्ये खासदार संजय मंडलिक यांच्याबद्दल नाराजी आहे?

परंतु मंडलिक शिंदे गटात असल्याने त्यांची उमेदवारी पक्की आहे. जागा वाटपात ही जागा जर भाजपने पदरात पाडून घेतली तर तेथे चिन्हाची अडचण येणार नाही. धनंजय महाडिक सध्या भाजपमध्ये असल्याने ते ऐनवेळी मैतदानात उतरतीलच. परंतु शिंदे गटाने ही जागा सोडली नाही आणि चिन्हाची अडचण आल्यास मंडलिकांना कमळावर लढावे लागेल.

धैर्यशील माने पुन्हा एकदा लोकसभेसाठी इच्छुक

हातकणंगलेमध्ये विद्यमान खासदार धैर्यशील माने पुन्हा एकदा लोकसभेसाठी इच्छुक आहेत. नुकताच त्यांनी आपला वाढदिवस जोरात करून हमभी किसीसे कम नाही हे दाखवून दिले आहे. चिन्हाचा प्रश्न निर्माण झाल्यास धैर्यशील माने यांना उलट फायद्याचेच ठरेल. त्यांची उमेदवारी शिंदे गटाकडून नक्की आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन जागेपैकी एक जागा जर भाजपने मागितली तरी एकनाथ शिंदे एक वेळ कोल्हापूरचा त्याग करतील पण हातकणंगलेची जागा सोडणार नाहीत.

हेही वाचा

लोकसभेसाठी शेट्टींची मशागत सुरू

आवाडेंशी दुश्मनी शेेट्टींच्या मुळावर

हातकणंगलेत महाआघाडीची भिस्त राजू शेट्टींवरच

प्रतीक पाटील मैदानात की शेट्टींवर दबावतंत्र…?

पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिनी विविध उपक्रम

राहूल आवाडेहेही भाजपकडून लोकसभेला इच्छुक

त्यामुळे धैर्यशील माने येथे तयारीला लागले आहेत. येथे त्यांच्याशिवाय राहूल आवाडेहेही भाजपकडून लोकसभेला इच्छुक आहेत. परंतु स्वत: प्रकाश आवाडे विधानसभेमध्ये असल्याने येथे धैर्यशील माने यांचे नाणे सध्यातरी खणखणीत वाटत आहे. मानेंना कोणत्याही चिन्हाचे वावडे नाही. कारण गेल्या निवडुकीत केवळ महिन्याभरात त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून खासदारकी मिळवली होती.

 

राजेेंद्र पाटील यड्रावकर यांच्यापुढेही निर्णय घेण्यासाठी मोठा प्रश्न

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदार संघातही महायुतीच अडचण निर्माण होणार आहे. येथे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून जिंकले होते. काळाची पावले ओळखून त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आणि मंत्रीपद पदरात पाडून घेतले. परंतु त्यानंतर मोठे राजकारण घडले आणि त्यांना शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा द्यावा लागला. येथे विद्यमान तेच असल्याने त्यांची उमेदवारी पक्की आहे. परंतु चिन्हाचा जर प्रश्न निर्माण झाल्यास त्यांनाही भाजपच्या चिन्हावर लढावे लागेल. येथे मात्र यांना विरोध होण्याची शक्यता आहे. कारण येथे भाजपमधून अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे राजेेंद्र पाटील यड्रावकर यांच्यापुढेही निर्णय घेण्यासाठी मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.

आवाडेंना कोणतेही अडचण येणार नाही.

हातकणंगले लोकसभा मतदार संघातील इचलकरंजी विधानसभा मतदार संघात अपक्ष आमदार प्रकाश आवाडे प्रतिनिधीत्व करीत आहेत. आमदार झाल्यानंतर त्यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यामुळे येथे आवाडेंना कोणतेही अडचण येणार नाही. सध्या आवाडे भाजपमध्ये असल्यासारखेच आहेत. त्यामुळे येथे भाजपचे उमेदवार प्रकाश आवाडे यांची उमेदवारी पक्की आहे.

इस्लामपूर मतदार संघातही उमेदवारी अडचण 

महायुतीमध्ये इस्लामपूर हा मतदार संघ शिवसेनेच्या वाटणीला आहे. गेल्या निवडणुकीत येथून शिवसेनेतर्फे गौरव नायकवडी यांना उमेदवारी मिळाली होती. त्यांच्या विरोधात निशिकांत पाटील यांनी बंडखोरी केली होती. सध्या या मतदार संघात शिवसेना ठाकरे गटापेक्षा शिवसेना शिंदे गटाची ताकद जास्त आहे. शिवसेना शिंदे गटाची आनंदराव पवार उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. जागाही शिवसेनेच्या वाटणीला आहे. परंतु भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील जोरदार तयारीला लागले आहेत. त्यांचा पहिला प्रश्न असेल तो जाग पदरात पाडून घेण्याचा त्यांना जर उमेदवारी मिळाली तर चिन्हाचा काही प्रश्न येणार नाही. ते कमळावर लढू शकतात. परंतु शिवसेना शिंदे गटाने प्रतिष्ठेचा प्रयत्न केला तर मात्र येथे आनंदराव पवार मैदानात उतरू शकतात. चिन्हाचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यांनाही कमळावर लढावे लागेल.

एकंदरीत सध्या शिंदे गटासमोर उमेदवारीची वाणवा नसून, चिन्हांचीच मोठी अडचण असणार आहे. त्यांना ऐनवेळी भाजप चिन्हावर लढण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज