वारणा उद्भव की चांदोली यासाठी सल्लागार

SHARE:

कृष्णा प्रदूषण रोखण्याचा देखील होणार अभ्यास

 

सांगली: सांगली व कुपवाड शहराला थेट चांदोलीतून पाणी आणायचे की वारणा उद्भव योजना राबवायची या संदर्भात येणारा खर्च व इतर अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कंपनीमार्फत कृष्णा नदीचे प्रदूषण रोखून सध्या कृष्णेतून पाणी घ्यायचे का? याचा देखील अभ्यास होणार आहे. या कंपनीकडून अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आयुक्त सुनील पवार यांनी दिली.

(sangli ) वारणा उद्भव की चांदोली यासाठी सल्लागार

सांगली व कुपवाड शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी वारणा उद्भव योजना राबवायची की थेट चांदोली धरणातून पाणी उचलून शहराला द्यायचे, या संदर्भातील चर्चेसाठी शुक्रवारी आयुक्त सुनील पवार यांनी महापालिकेत बैठक झाली. या बैठकीला जलसंपदाच्या कोल्हापूर विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक नवनाथ अवताडे, मनपा उपायुक्त वैभव साबळे, उपायुक्त पंडित पाटील, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे विशेष कार्यअधिकारी सुनील पाटील, कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, जलसंपदा विभागाचे निवृत्त अधिकारी विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, जीवन प्राधिकरणचे अधिकारी एस. के. रांजणे, उपअभियंता राजाराम गळंगे आदी उपस्थित होते.

केंगार, रांजणे यांनी शुध्द पाण्यासाठी चांदोली धरण हाच एकमेव स्त्रोत असल्याकडे लक्ष वेधले.

महापालिकेने हाच प्रस्ताव शासनाकडे पाठवावा अशी आग्रही मागणी केली. नैसर्गिक उताराने हे पाणी सांगलीपर्यंत येऊ शकते. महापालिकेच्या भविष्यातील दहा लाख लोकसंख्येसाठी दोन टीएमसी पाणी पुरेसे आहे. मार्गातील अन्य शहरांनाही या योजनेतून पाणी देता येईल. एक हजार कोटींचा निधी उभा करण्यासाठी लोकप्रतिनिधी समर्थ असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वे पूल धोकादायक
सांगलीत दररोज सात जणांना कुत्र्याचा चावा
उदगाव कुंजवन भगवान आनंद महोत्सव सोहळ्यास प्रारंभ
(sangli )रेल्वे पुलासाठी दिल्लीत धडक मारु

पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिनी विविध उपक्रम

म्हैसाळ बॅरेजमुळे बॅक वॉटरचा फुगवटा कृष्णा, वारणा नदीत येणार आहे.

वारणेतून अशुध्दच पाणी घ्यायचे असेल तर मग कृष्णा नदीऐवजी अन्यत्र पाणी उचलण्यासाठी का जायचे, का प्रश्न दिवाण व केंगार यांनी उपस्थित केला. वारणा नदीत मृत झालेल्या माश्याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

सांगली, कुपवाडसाठी थेट चांदोली धरणातून पाणी आणायचे झाल्यास 1200 कोटी रुपयांचा निधी लागेल.

मिरज शहराचा समावेश करायचा झाल्यास आणखी 250 कोटी रुपये लागतील. महापालिकेचा हिस्सा 400 कोटींवर जाईल. महापालिका निधीतून ही रक्कम उभारणे अशक्य आहे. 110 किलोमीटर लांबीच्या योजनेची देखभाल करणे ही बाबही अवघड असेल.

सध्या माळबंगला येथील 70 एमएलडीचा जलशुद्धीकरण प्रकल्प अतिशय चांगला आहे.

गेल्या दहा वर्षात कॉलरा, काविळीची साथही आलेली नाही. वारणा उद्भव योजनेचा प्रस्ताव केला जात आहे. कृष्णा नदीचे पाणीही जास्तीत जास्त चांगले, शुद्ध, जास्त दाबाने पाणी पुरवठा करणे याबाबींवर भर देता येईल, असा सूर महापालिकेच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला.

 

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *