sangli ncp news : पद्माकर जगदाळेंच्या पैशाची ऑफर धुडकावल्यानेच आरोप : मैनुद्दीन बागवान : स्वीकृत नगरसेवकपदासाठी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे व दिगंबर जाधव यांनी मला पैशाची ऑफर दिली होती. मात्र मी ती धुडकावून लावल्याने माझ्यावर पैशाचे ऑफर होत आहेत. त्यांनी आरोप सिध्द करावेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी दिला. शिवाय पक्षश्रेष्ठीकडे लवकरच याबाबत अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
sangli ncp news : पद्माकर जगदाळेंच्या पैशाची ऑफर धुडकावल्यानेच आरोप : मैनुद्दीन बागवान
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वीकृत नगरसेवकपदी अशोक मासाळे यांची निवड केली आहे. मात्र या निवडीविरोधात मैनुद्दीन बागवान यांच्या आरोप होत आहेत. काही पदाधिकार्यांनी राजीनामे देखील दिले आहेत. याबाबत खुलासा करताना मैनुद्दीन बागवान म्हणाले, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे व इच्छूक दिगंबर जाधव यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यात कुठलेही तथ्य नाही.
दिगंबर जाधव यांच्या नावासाठी पक्षाकडून कुठलाही आदेश मला मिळाला नाही. माझे नाव यादीत घ्या, असे जगदाळेच सांगत होते. शेवटी सर्व नगरसेवकांचे म्हणणे ऐकले. त्यानंतर स्नेहल सावंत आणि अशोक मासाळे यांची नावे अंतिम केली.
आमच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनातच काम केले जात आहे. 2008 मध्ये महापौर असताना पक्षाने सांगितले म्हणून मी राजीनामा दिला होता, प्रोटोकॉल पाळणारा कार्यकर्ता आहे. सध्या मी गटनेता झाल्यापासून जिल्हाध्यक्षाकडून कुठलेही सहकार्य मिळत नाही.
उलट ते छळ करत आहेत. गटनेत्याला टाळून महापौर, आयुक्तांना पत्रव्यवहार करत आहेत. पक्षाने या प्रकरणाची दखल घेऊन भेटीला बोलावले तर, मी सांगतील तिथे जाऊन म्हणणे मांडेन. निवडणुकीत दिगंबर जाधव यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली होती, त्यांनी दिली नाही म्हणून ते राष्ट्रवादीकडे आले. गटनेता म्हणून मला हटवण्यासाठी इथल्या कुणी कष्ट घ्यायची गरज नाही. दोषी आढळल्यास पक्षश्रेष्ठी सांगतील तेव्हा मी राजीनामा देईन.
अशोक मासळे यांना ‘स्वीकृत’चा शब्द जगदाळेंचा
प्रभाग क्रमांक दहामधून अशोक मासाळे व त्यांच्या पत्नीने पक्षाकडून उमेदवारी मागितली होती. शहर जिल्हाध्यक्ष जगदाळे यांनी त्यांना स्वीकृतचा शब्द दिला होता. पण त्यांनी ऐनवेळी स्वत:चे नाव घेतले. तर खासदार संजय पाटील, पद्माकर जगदाळे, निशिकांत पाटील यांच्यासह नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत जी दोन नावे अंतिम झाली. तीच नावे सभागृहात पीठासीन अधिकारी तथा महापौरांना देण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण मैनुद्दीन बागवान यांनी दिले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










