kasbe digraj news : कसबे डिग्रजजवळील रखडलेल्या रस्त्याचे काम सुरु होणार : गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या सांगली-पेठ राष्ट्रीय महामार्गाच्या वादावर अखेर सोमवारी पडदा पडला. तुंग-कसबेडिग्रज या मार्गावर थांबलेल्या 18 मीटरच्या दीड किलोमीटरच्या रस्त्याला मंजुरी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आली. या रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने प्रलंबित रस्त्याचे तत्काळ काम सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी दिले.
kasbe digraj news : कसबे डिग्रजजवळील रखडलेल्या रस्त्याचे काम सुरु होणार
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत निर्णय
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सांगली-पेठ राष्ट्रीय महामार्गवरील कसबे डिग्रज गावच्या हद्दीतील प्रलंबित रस्त्याबाबत तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी घोष यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला खासदार विशाल पाटील, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील विविध लोकप्रतिनिधी तसेच भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी विशाल यादव, मंडल कार्यालय, महसूल कार्यालय नॅशनल हायवे अथॉरिटी यांच्यासह महामार्गालगतचे विरोध करणारे शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
सांगली-पेठ रस्त्याचे काम एक वर्षापूर्वी पूर्ण झाले आहे. मात्र तुंग-कसबेडिग्रज या मार्गावरील मिणचे मळा परिसरात पथकर वसुली नाका बसविण्यासाठी शेतीचे अतिक्रमण करण्यात येणार आहे, त्यामुळे शेतकर्यांनी विरोध केला आहे, त्यामुळे सुमारे दीड किलोमीटर रस्त्याचे काम थांबले होते. सुमारे रस्त्याचे 18 मीटरने डांबरीकरण करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
या रखडलेल्या रस्त्यावर काम सुरू करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या. राष्ट्रीय महामार्गावरील मिणचे मळा परिसरात सुमारे दीड किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणासह टोल प्लाझा उभारणीसाठी सुरू असलेल्या भूसंपादनावरून वाद निर्माण झाला आहे. रस्त्याची रुंदी 15 मीटर की 24 मीटर यावर शेतकरी आणि प्रशासनामध्ये मतभेद आहेत.
त्यामुळे काम ठप्प झाले होते. परिसरात खड्डे, धूळ आणि वाहतुकीचा मोठा त्रास निर्माण झाला आहे. यामुळे पिकांचे नुकसान तसेच पाणीपुरवठा व गॅस पाइपलाइनला धोका असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, रस्त्यावरील सुरक्षा व्यवस्थेअभावी अपघात वाढले असून दोन दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनेत दोन युवकांचा मृत्यू झाला. यानंतर परिसरात तीव्र आंदोलन झाले होते. या सगळ्या प्रलंबित प्रश्नाबाबत या बैठकीत चर्चा झाली.
टोल नाका रद्दसाठी नितीन गडकरींना भेटणार ः विशाल पाटील
सांगली-पेठ राष्ट्रीय महामार्गावरील तुंग-कसबेडिग्रज येथील मिणचे मळा परिसरात सुमारे दीड किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणासह टोल प्लाझा उभारणीसाठी सुरु असलेल्या भूसंपादनावरून वाद सुरु आहे. या मार्गावर टोल बसविण्यास सर्वांचाच विरोध आहे. टोल नाका रद्द करण्याच्या मागणीसाठी केंद्रिय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांना भेटणार असल्याचे खासदार विशाल पाटील यांनी सांगितले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










