islampur crime news : इस्लामपुरात भरदिवसा पाठलाग करून तरुणावर खुनी हल्ला : गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या टोळक्याने धारदार शस्त्रे नाचवत विनोद उर्फ बाल्या रामचंद्र माने-वडार ( वय २२ रा. वडार गल्ली इस्लामपूर ) या तरुणांवर पाठलाग करत खुनी हल्ला केला. भर दुपारी दीडच्या सुमारस हा प्रकार घडला. जखमी विनोदचे दोन मित्र दुचाकी सोडून पळाल्याने ते बचावले. धारदार शस्त्रे हातात घेऊन नाचवणारे टोळके पाहून चव्हाण कॉर्नर परिसरात दहशत निर्माण झाली होती.
islampur crime news : इस्लामपुरात भरदिवसा पाठलाग करून तरुणावर खुनी हल्ला
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या टोळक्याकडून कृत्य ? फिल्मी स्टाईल थरार
याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद झाला नव्हता. फिल्मी स्टाईल थरार अनेकांनी अनुभवला. गंभीर जखमी असलेल्या विनोदवर रात्री उशिरापर्यंत शस्त्रक्रिया सुरू होत्या.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अशी ; विनोद उर्फ बाल्या माने-वडार हा त्याचे मित्र जुबेर मुजावर व प्रवीण लोखंडे यांच्या बरोबर दुचाकीवरून शेतात जेवण करण्यासाठी निघाले होते. गाडीमध्ये तेल नसल्याने पेट्रोल टाकण्यासाठी पेठ रस्त्यावर निघाले होते. शिराळा नाका येथून दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला.
islampur-crime-news-murderous-attack-on-a-young-man-in-broad-daylight-in-islampur
आपला पाठलाग होतोय असे लक्षात आल्यावर विनोद वडार याने गाडी चव्हाण कॉर्नर शेजारील पेट्रोल पंपात घेतली. आणि जीव वाचवण्यासाठी समोर असलेल्या दुचाकीच्या शोरूम मध्ये धाव घेतली. हातात शस्त्र असणारे टोळके पाहून पेठ रस्त्याने ये-जा करणाऱ्यांची गर्दी जमली. दरम्यान विनोद वडार एकटाच शोरूमच्या पाठीमागील दरवाजाने जीव वाचवण्याच्या हेतूने मला वाचवा मला वाचवा म्हणत पेट्रोल पंपाच्या मागे रिकाम्या प्लॉटकडे धावला. तेव्हा भिंतीवर उडी मारून जाणाऱ्या विनोदला हल्लेखोरांनी पाहिले. आणि त्याच्यावर हल्ला करण्याच्या दृष्टीने पाठलाग केला.
दुकानात आत प्रवेश करून कमरेच्या खाली सपासप वार केले.
जीव वाचवण्याच्या दृष्टीने पंपाच्या मागे असणाऱ्या किसान कृषी या दुकानाच्या शेड मध्ये आत घुसला आणि शेडचा सरकता दरवाजा लावण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी दरवाजा लावताना रोखून धरले. आणि त्या झटापटीत दरवाजा खाली कोसळला. तेव्हा दुकानात आत प्रवेश करून कमरेच्या खाली सपासप वार केले. धारधार शस्त्राचे वार वाचवण्याच्या प्रयत्नात दोन्ही हातावरही जखमा झाल्या. धारदार शास्त्राचे घाव बसल्याने विनोद रक्तबंबाळ होऊन तडपडत असताना हल्लेखोरांनी पलायन केले.
दरम्यान त्याच्यासोबत असणारे जुबेर मुजावर व प्रवीण लोखंडे हे मित्र घटनास्थळावर आले.
नंतर काही क्षणातच पोलीस गाडी घटनास्थळी आली. जखमी अवस्थेत विनोदला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. इस्लामपुरात मागील महिन्यात खुनाचा प्रकार घडला होता. आजच्या प्रकाराने शहरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.