दक्षिण भारत जैन सभेत अल्पसंख्याक दिन साजरा
अल्पसंख्यांक समाजाला सुरक्षितता लाभावी. ज्या-ज्या देशात जो-जो समाज अल्पसंख्यांक आहे, त्यांचे रक्षण व्हावे, त्यांना योग्य ती वागणूक मिळावी, संविधानाने हा हक्क दिला असला तरी अल्पसंख्याक समाजाने कर्तव्याचेही भान ठेवणे आवश्यक असल्याचे मत दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
jain samaj news : अल्पसंख्याकांनी हक्कासोबत कर्तव्ये जाणावीत ः रावसाहेब पाटील
येथील दक्षिण भारत जैन सभेच्या मध्यवर्ती कार्यालयात जागतिक अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला. सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील व चेअरमन रावसाहेब पाटील यांच्या हस्ते भगवान महावीरांच्या प्रतिमेसमोर दिपप्रज्वलन करण्यात आले.
चेअरमन रावसाहेब पाटील यांनी अल्पसंख्याक दिनाचे महत्त्व, हक्क आणि अधिकाराविषयी मनोगत व्यक्त केले. आपल्या देशात जैन, मुस्लिम, शीख, ईसाई, ख्रिश्चन, पारसी हे अल्पसंख्याक म्हणून ओळखले जातात. अल्पसंख्यांकामध्येसुद्धा धार्मिक आणि भाषिक दोन्ही प्रकारचे अल्पसंख्याक समाज असतो. देशपातळीवर बघितले तर जसे हिंदू समाज काश्मिरमध्ये अल्पसंख्याक आहे.
जैन समाजतर संपूर्ण देशात अल्पसंख्याक आहे.
चीनमध्ये बौध्दधर्म अल्पसंख्याक असला तसेच इराण-इराक या देशात मुस्लिम समाज बहुसंख्य असला तर इतर समाज तरी बाकीचा समाज अल्पसंख्याक असतो. सर्वच अल्पसंख्याक समाज गुण्यागोविंदाने रहावा यासाठीच हा दिन आजच्या दिवशी साजरा केला जातो. अल्पसंख्याक म्हणून ज्या लाभाच्या योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
याप्रसंगी राजेंद्र झेले, अनिल बागणे, शांतिनाथ नांदगावे, महामंत्री प्रा. एन. डी. बिरनाळे, महिला महामंत्री कमल मिणचे, विजयाताई पाटील, भाऊसाहेब पाटील, विमल पाटील, संदीप राजोबा आदी उपस्थित होते.
फोटो ओळी ः दक्षिण भारत जैन सभेच्या कार्यालयात अल्पसंख्याक दिनानिमित्त भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजन करताना रावसाहेब पाटील, भालचंद्र पाटील, राजेंद्र झेले, अनिल बागणे, महामंत्री प्रा. एन. डी. बिरनाळे आदी.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



