jayant patil news : राजारामबापू कारखान्यामार्फत 25 लाख रोपे शेतकर्यांच्या बांधा वर पोच करणार : उत्पादन वाढीत शुध्द बियाणे हा एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे आपण गेल्या 2-3 वर्षापासून आपल्या साखर कारखान्या मार्फत ऊस उत्पादक शेतकर्यांना ऊस रोपे पुरवठा करीत आहोत. यावर्षी आपण राजारामबापू साखर कारखान्यामार्फत 25 लाख रोपे ऊस उत्पादक शेतकर्यांच्या बांधा वर पोच करणार आहोत,असा विश्वास राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी व्यक्त केला.
jayant patil news : राजारामबापू कारखान्यामार्फत 25 लाख रोपे शेतकर्यांच्या बांधा वर पोच करणार
प्रतिकदादा पाटील यांनी तांबवे,धोत्रेवाडी, येवलेवाडी गावांचा संपर्क दौरा करून ऊस उत्पादक शेतकर्यांशी संवाद साधला,त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.माजी जि.प. अध्यक्ष,कारखान्याचे संचालक देवराज पाटील,अतुल पाटील,कृष्णेचे संचालक लिंबाजी पाटील,ब्रम्हानंद पाटील,डॉ.अशोक पाटील,राजारामबापू दूध संघाचे संचालक पोपट जगताप,विजयकुमार नलवडे, राजारामबापू बँकेचे माजी संचालक रामभाऊ माळी,मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, सचिव डी.एम. पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. या दौर्यात प्रतिकदादा पाटील यांनी शेतकर्यांच्या अडी-अडचणी,प्रश्न ऐकून घेतले. त्यातील शक्य असणार्या प्रश्नांचे जागेवर निराकरण केले. उर्वरित प्रश्न त्यांनी स्वतः लिहून घेतले. धोत्रेवाडी येथे वनश्री सुरेश माळी,माधवी विजय ताटे यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
प्रतिकदादा पाटील म्हणाले,आपल्या गावात ज्या परिसरात क्षारपड जमिनीचा प्रश्न आहे,त्या परिसरातील शेतकर्यांनी एकत्र येऊन सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली योजनेचा लाभ घ्यावा. आपण गाताडवाडी येथे हा प्रकल्प राबवित असून दुसर्या टप्प्यात बोरगाव येथे हा प्रकल्प राबवित आहोत. या कामी जो खर्च येईल,त्याची परतफेड आपल्या वाढीव उत्पादनातून होऊ शकतो.
ज्या भागात पाण्याची कमतरता आहे,त्या भागात आपण ठिबक सिंचनची योजना देत आहोत. आपण कारखान्याच्या विविध योजनांची माहिती करून घ्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा. देवराज पाटील म्हणाले,राजारामबापू साखर कारखान्याने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. कोरोना काळात आपल्या तिन्ही गावातील ऊस मोठ्या प्रमाणात शिल्लक होता. इतर कारखाने टोळ्या घेऊन निघून गेले. मात्र हा ऊस आपल्या राजारामबापू साखर कारखान्याने नेला आहे. आपले तीन पिढ्यांचे नाते आहे,ते आपण जपूया.
jayant-patil-news-rajarambapu-will-deliver-25-lakh-seedlings-to-farmers-fields-through-the-factory
तांबवेचे सरपंच सुभाष खराडे,माजी संचालक के.के.पाटील,तानाजी मोरे,पै. अशोक मोरे,सदाशिव पाटील,सर्जेराव निंबाळकर,प्रल्हाद पाटील,पवन मोरे, अभिजित पाटील,अवधूत जाधव,धोत्रेवाडीचे सरपंच प्रदीप माने,जालिंदर जाधव,वसंतराव माळी,गुणवंत माने,शंकरराव जाधव,पोपटराव सुर्यवंशी, बाळासाहेब जाधव,राजाभाऊ ताटे, येवलेवाडीच्या सरपंच पूनम जगताप,बालाजी जगताप,निवृत्ती जगताप (गुरुजी),शिवाजी जगताप (गुरुजी),तानाजी जगताप,डॉ.वैभव जगताप,पांडुरंग जगताप,चंद्रकांत जगताप यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी,तसेच जे. बी.पाटील,प्रेमनाथ कमलाकर,धनाजी लाड, दिलीप पाटील,विकास कदम आदी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











