महोत्सवासाठी उपस्थित रहा ः प.पू. जिनसेन भट्टारक
jain samaj news : नांदणीत 1 जानेवारीपासून पंचकल्याणिक पूजा : नांदणी (ता. शिरोळ) येथील वृषभाचल अतिशय क्षेत्रावर पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव व महामस्तकाभिषेक सोहळा दि. 1 ते 9 जानेवारी 2025 रोजी आयोजित केला आहे. ही पूजा फक्त नांदणीपुरती मर्यादीत नसून मठाच्या अधिपत्याखालील संपूर्ण 743 गावाची पूजा आहे.
jain samaj news : नांदणीत 1 जानेवारीपासून पंचकल्याणिक पूजा
पूजामहोत्सवासाठी श्रावक व श्राविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प.पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य यांनी केले.
दक्षिण भारत जैन सभेच्या सांगलीतील जैन बोर्डिंगमध्ये आयोजित सभेत प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य बोलत होते. जिनसेन भट्टारक पट्टाचार्य म्हणाले, नांदणी येथे नूतन 21 फुट उंच भ. मुनिसुव्रतनाथ तीर्थंकरांची पद्मासन मूर्ती, बाजूला दाक्षिणात्य शिल्पकलेतील पांढर्या पाषाणातील जिनमंदिर (प्रथम शासनदेवी, चक्रेश्वर मंदिर) उभारले असून यामध्ये भ. आदिनाथांची मूर्ती प्रतिष्ठापित होणार आहे. भ. आदिनाथ तीर्थंकर बृहन्मूर्तीचा महामस्तकाभिषेक सोहळा संपन्न होणार आहे.
मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. नांदणी मठाचे ट्रस्टी प्रा. आप्पासाहेब भगाटे यांनी मठ अणि पूजा महोत्सवातील सर्व कार्यक्रमाचे नियोजन व स्वरूप विषद केले. पूजा महोत्सवाचे कार्याध्यक्ष सागर शंभूशेटे यांचेही मनोगत झाले. यावेळी सांगली विभागाचे उपाध्यक्ष शशिकांत राजोबा, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. चंद्रकांत चौगुले आदी उपस्थित होते. वीर सेवा दलचे सेक्रेटरी अजित भंडे यांनी आभार मानले
यावेळी शांतिनाथ नंदगावे, कमल मिणचे, अनिता पाटील, अंजली कोले, अरूणाताई पाटील, गीतांजली उपाध्ये, डॉ. नरेंद्र खाडे, एस. पी.मगदूम, कुबेर शेडबाळे, जिनेश्वर पाटील, बबन थोटे, अमोल पाटील, प्रशांत अवधूत, प्रकाश मगदूम, बाळासाहेब पल्लखे, रविंद्र खोत आदी उपस्थित होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



