राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी आक्रमक
jayant patil news : भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना खूश करण्यासाठी पडळकरांची जयंतराव पाटलांवर टीका : आ. जयंत पाटील जलसंपदामंत्री असताना त्यांनी जत व आटपाडी तालुक्यातील अनेक दुष्काळी गावांना पाणी दिले. पण आ. जयंत पाटील यांच्यावर टीका केल्याशिवाय आ. गोपीचंद पडळकर यांचे राजकारण होत नाही. मुंबईतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना खूश करण्यासाठी त्यांचा हा उद्योग सुरू असल्याचा असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील व माजी नगरसेवक हरिदास पाटील यांनी दिला.
jayant patil news : भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना खूश करण्यासाठी पडळकरांची जयंतराव पाटलांवर टीका
भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी सांगली येथील जाहीर सभेत आ. जयंत पाटील यांनी सांगलीचा विकास केला नसल्याची टीका केली होती. त्या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी उत्तर दिले. यावेळी सचिव बाळासाहेब पाटील, माजी नगरसेवक हरिदास पाटील, मैनुद्दीन बागवान, अजित दुधाळ, महिला आघाडीच्या सुस्मिता जाधव आदी उपस्थित होते.
हरिदास पाटील म्हणाले, राज्यात भाजपाची एकहाती सत्ता असून देखील आ. जयंतराव पाटील यांच्यावर टीका केल्याशिवाय आ. गोपीचंद पडळकर यांचे राजकारण चालत नाही. त्यांनी मंत्रीपदाच्या काळात आ. जयंतराव पाटील यांनी जिल्ह्यासाठी काय काम केले? याचा हिशोब मागत आहेत. जलसंपदामंत्री असताना आ. पाटील यांनी जत तालुक्यातील वंचित 65 गावांना विस्तारित म्हैसाळ योजनेचे 6 टीएमसी दिले होते. तर आटपाडी तालुक्यातील गावांना टेंभू योजनेतून 8 टीएमसी पाणीसाठा आरक्षित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
तर आ. पडळकर यांच्या पडळकरवाडीच्या शेजारी टेंभू योजनेच्या निंबवडे वितरिकेचे काम देखील आ. जयंतराव पाटील यांनी मार्गी लावले. कृष्णा काठावरील पुराचे वाहून जाणारे 2.5 टीएमसी पाणी दुष्काळी भागाला दिलेे. भाजप सरकार राबवत असलेली ‘माझी शाळा आदर्श शाळा’ व ‘स्मार्ट पीएचसी’ योजनेचे जनक आ. जयंत पाटील असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळासाहेब पाटील म्हणाले, आ. गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात स्वत:ला हुबलाक असल्याचे कबुल केले आहे. त्यांनी आ. जयंत पाटील यांच्यावर टीका करण्यापेक्षा जत तालुक्यातील विकासकामे करून दाखवावीत. अजित दुधाळ म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षणावर आ. गोपीचंद पडळकर यांनी बोलणे आवश्यक होते. पण ते बोलले नाहीत. खा. शरद पवार यांच्यामुळे आ. पडळकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती.
भाजप प्रवेशाच्या अफवा; प्रदेशाध्यक्ष बदल नाही…
आ. जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षात नाराज असल्याच्या केवळ अफवा आहेत. पक्षाच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष बदलाचा विषय झाला नाही. उलट अनेक वर्षांपासून असलेले पदाधिकारी बदलाचा विषय झाला होता. शिवाय आ. जयंत पाटील नाराज नाहीत. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या केवळ अफवा असल्याचा खुलासा जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी सांगितले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



