rajkiyalive

जेष्ठ, दिव्यांग बजावणार केंद्रावरच मतदानाचा हक्क

जनप्रवास । प्रतिनिधी
जेष्ठ, दिव्यांग बजावणार केंद्रावरच मतदानाचा हक्क : सांगली ः आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच 85 पेक्षा जास्त वय असणारे आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक विकलांग असणार्‍या नागरिकांना घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, या अभियानाचे स्वागत झाले असले तरी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचा निर्णय बहुतांशी मतदारांनी दाखवत, स्वतःचा स्वाभिमान जपला आहे.

जेष्ठ, दिव्यांग बजावणार केंद्रावरच मतदानाचा हक्क

वय झाले तरी स्वाभिमान जपण्याचा निर्धार

राज्यातील 85 पेक्षा जास्त वयोगटातील तब्बल 26 लाख 70 हजार, तर शारीरिक विकलांग पाच लाख 90 हजार 382 नागरिकांना या सुविधेद्वारे घरातून मतदान करता येणार आहे, मात्र याला राज्यभर म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. सांगली जिल्ह्यात एकूण 18 लाख 68 हजार 174 इतके मतदार आहेत, यापैकी सुमारे 39 हजार मतदार हे जेष्ठ मतदार आहेत, तर जिल्ह्यातील 34,265 दिव्यांगापैकी सुमारे 20 हजार दिव्यांग मतदार आहेत, मातरव अवघ्या एक टक्के म्हणजे 1800 मतदारांनी घरातून मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे.
दोन वेळा दिली जाणार संधी

जिल्हा प्रशासनाकडून मतदार यादीत नाव असणार्‍या संबंधित नागरिकांना ’12-ड’ हा अर्ज घरोघरी जाऊन दिला जाणार आहे.

हा अर्ज या नागरिकांकडून भरून घेतला जाणार आहे. अर्जात संबंधित नागरिकांना घरातून मतदान करणार किंवा प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार, याबाबतची माहिती घेतली जाईल. या अर्जावर संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी निर्णय घेतील. या नागरिकांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केल्यास उर्वरित मतदारांना विशेषतः तरुणांना त्यातून प्रोत्साहन मिळणार आहे. यासाठी प्रशासनाकडून दोन वेळा विचारणा केली जाईल.

पारदर्शकतेसाठी चित्रीकरण

घरातून मतदान करताना राजकीय पक्ष आणि निवडणुकीतील उमेदवारांचे प्रतिनिधी, निवडणूक अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित असतील. मतदानाचे चित्रीकरण केले जाणार आहे. यातून या सुविधेची पारदर्शकता जपली जाणार आहे, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आपले आहे.

सक्षम अ‍ॅपचा आधार

दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना सक्षमपद्वारे मतदानासाठी लागणार्‍या सहाय्याची मागणी नोंदवावी लागेल. त्याद्वारे मतदारसंघातील दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांचे मतदारसंघ व स्थान निश्चिती यंत्रणेला करणे शक्य होईल. त्यानुसार वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर, सहायक इ. पोहोचविण्याची व्यवस्था निवडणूक यंत्रणा करील. मतदारसंघनिहाय दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना द्यावयाच्या सुविधांच्या उपलब्धतेबाबत विभागीय आयुक्त हे मूल्यमापन करणार आहेत. 1950 हेल्पलाइन व व्हिडीओ कॉल सुविधा असेल.

सांगली लोकसभा मतदारसंघ
एकूण मतदार – 18,68, 174
एकूण दिव्यांग – 34,265
जेष्ठ मतदार – 39,000
दिव्यांग मतदार – 20,000
घरी मतदान नोंदणी – 1800
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज