rajkiyalive

kagalmadhe rada : कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले

एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी

कागल –

kagalmadhe rada : कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापलं आहे. त्यात कागलमध्ये राष्ट्रवादीच्या 2 गटात थेट लढत आहे. इथं हसन मुश्रीफ विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून समरजितसिंह घाटगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमावेळी कागलमध्ये मुश्रीफ आणि घाटगे समर्थक एकमेकांना भिडले. कार्यकर्त्यांनी कॉलर पकडून हाणामारी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

kagalmadhe rada : कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले

एबीपी माझा या वाहिनीने मुद्द्याचं बोला हा कार्यक्रम कागलमध्ये आयोजित केला होता. यावेळी हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे समर्थक आपापले मुद्दे मांडत होते. मात्र काही मुद्द्यांवरून या दोन्ही गटात वाद झाला. त्यानंतर हा वाद इतका विकोपाला गेला ज्यात दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, तिथे जोरदार हाणामारी सुरू झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू होती. मात्र अपशब्द उच्चारल्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. त्यानंतर कॉलर पकडून कार्यकर्त्यांनी हाणामारी सुरू केली. त्यात रस्त्याकडेला पार्किंग असणार्‍या अनेक दुचाकीही खाली पडल्या.

या कार्यक्रमाचं निवेदन करणारे अभिनेता पंढरीनाथ कांबळे यांनी कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. एकमेकांची कॉलर पकडून दगडफेक करण्यापर्यंत वाद झाला. या कार्यक्रमावेळी लोकही मोठ्या प्रमाणात होते. सुरुवातीचे 12 मिनिटे कार्यक्रम व्यवस्थित सुरळीत पार पडला, नागरिक त्यांचे मुद्दे मांडत होते. परंतु शांततेत सुरू असणार्‍या कार्यक्रमात दोन्ही गटाकडून घोषणाबाजी झाली. त्यात कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या कार्यक्रमाजवळ एका इमारतीचं बांधकाम सुरू होते त्याठिकाणी असलेल्या विटा कार्यकर्ते एकमेकांवर मारत होते. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहचले आणि गोंधळ नियंत्रणात आणला.

हसन मुश्रीफ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत गेल्या महायुतीकडून पुन्हा त्यांना उमेदवारी देण्यात आली. तर आपल्याला तिकीट मिळणार नाही यामुळे भाजपात असलेले समरजितसिंह घाटगे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीकडून समरजितसिंह घाटगे यांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यात येत्या विधानसभेला लढत होणार आहे. मात्र प्रचाराच्या सुरुवातीपासून इतका संघर्ष कागलमध्ये सुरू झाल्याने येत्या काळात तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज