malangaon news : मळणगांव येथे मोटरसायकल जळून खाक : कवठेमहांकाळ (प्रतिनिधी):- कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगांव येथील जुन्या तासगांव रस्त्यावरील गावातील नाईक समाज वस्तीजवळ असलेल्या अग्रणी नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्यावर अज्ञात मोटारसायकलने पेट घेतला.यांत मोटरसायकल जळून खाक झाली.ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
malangaon news : मळणगांव येथे मोटरसायकल जळून खाक
याबाबत मळणगांवचे पोलीस पाटील मनोज जाधव यांनी घटनेची माहिती दूरध्वनीवरून कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यास दिली आहे.सोमवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या एक तरूण गावाच्या पश्चिम बाजूच्या दिशेने या बंधार्यावर आला असल्याचे समजते. तो तरूण पुलावर आल्यानंतर मोटरसायकल सायकल पेटल्याने मोठा जाळ झाला.त्यानंतर तो मोटरसायकल सायकलस्वार मळणगांवच्या दिशेने पुर्वेकडे पळून गेला असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.
सदर मोटरसायकल सायकलचा क्रमांक एम.एच.09/ एक.एस. 8194 असल्याचे दिसून येत आहे. मोटर सायकल स्वार गाडी पटल्यानंतर घटना स्थळापासून पूर्वेकडील दिशेने पळून गेला असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. मोटरसायकल पेटली की पेटवली असा प्रश्न उपस्थित होत आहे.तसेच मोटरसायकल स्वार कोण? याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे.—–
( फोटोओळ: मळणगांव येथील गावाच्या पश्चिमेकडील असलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्यावर मोटरसायकलने पेट घेतला. )

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.




