malwadi news : माळवाडीत पावसाचे पाणी शेतात सोडल्याच्या रागातून मामांनी केली भाच्यांना मारहाण : मिरज तालुक्यातील माळवाडी येथे स्वत:च्या फॅक्टरीसमोर साचलेले पाणी चर काढून नजीकच्या शेतात सोडल्याचा कारणातून दोन मामांनी त्यांच्या दोन भाच्यांचा मारहाण केली. सदर मारहाणीची घटना बुधवार दि. 21 मे रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास केळी वेफर्स बनविणार्या फॅक्टरीसमोर घडली.
malwadi news : माळवाडीत पावसाचे पाणी शेतात सोडल्याच्या रागातून मामांनी केली भाच्यांना मारहाण
यामध्ये सूर्यकांत बाळासाहेब चौगुले (वय 38, रा. माळवाडी ) आणि त्याचा भाऊ असे दोघे जखमी झाले. या प्रकरणी सूर्यकांत चौगुले यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित प्रशांत श्रीधर लटपटे, प्रदीप श्रीधर लटपटे, सुमित प्रशांत लटपटे आणि सिध्दार्थ प्रद्रीप लटपटे (रा. सावळवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जखमी सूर्यकांत चौगुले हे मिरज तालुक्यातील माळवाडी परिसरात राहतात. याच परिसरात संशयित देखील राहतात. जखमी सूर्यकांत चौगुले यांची माळवाडी येथे केळीचे वेफर्स तयार करण्याची फॅक्टरी आहे. सतत सुरु असणार्या पावसामुळे त्यांच्या फॅक्टरीच्या बाहेरील बाजूस पावसाचे पाणी साचले होते. फॅक्टरीमध्ये ते पाणी येत असल्याने सूर्यकांत यांनी चर काढून शेजारी असलेल्या मामाच्या शेतात सोडले.
malwadi-news-uncles-beat-up-nephews-in-anger-over-releasing-rainwater-into-fields-in-malwadi
याचा राग आल्याने प्रशांत यांनी, तू आमच्या शेतात पाणी का सोडले ? असा जाब सूर्यकांत यांना विचारला. यावेळी झालेल्या वादावादीतून संशयित चौघांनी सूर्यकांत आणि त्याचा भाऊ यांना लाथाबुक्कयांनी मारहाण केली. घडलेल्या या घटनेनंतर सूर्यकांत चौगुले यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणार्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.