political news : जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोंबरला

SHARE:

political news : जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोंबरला : लोकसभा निवडणुकीत चुक झाली होती. ती चूक विधानसभेला आपण सुधारल्याने मोठे यश मिळाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत यश मिळवण्यासाठी कामाला लागा. या निवडणूका सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगलीत दिले. ताकदीने लढा, जिथे जिथे जिंकाल तिथे शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास कामांसाठी निधी देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

political news : जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोंबरला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ः स्थानिक स्वराज्य संस्था जिंका, भरघोस निधी देवू

येथे सांगली-कोल्हापूर रोडवरील नत्रक्ष कार्यालयात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कोल्हापूरचे खा. धनंजय महाडीक, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. गोपीचंद पडळकर, आ. सत्यजित देशमुख, पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, पृथ्वीराज पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सम्राट महाडीक व प्रकाश ढंग यांचा तर वाढदिवसानिमीत्त माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सांगली जिल्ह्यात पक्षाला यापुर्वी कार्यकर्त्यांनी मोठ यश मिळवून दिले आहे. येथे आपाल्याला शंभर पैकी शंभर मार्क मिळवण्याचा सराव आहे. पण लोकसभेला आपली चूक झाली. ही चूक लगेचच विधानसभा निवडणूकीत आपण दुरुस्त केली. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत आपल्याला अभूतपूर्व यश मिळाले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणूकीसाठी तयारी करत आहे. साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये या निवडणूका होतील.

निवडणूक आयोगाची आजवरची कामाची पध्दत पाहता आधी जिल्हा परिषद व नगरपालिका व त्यानंतर पंधरा दिवसांनी महापालिकांच्या निवडणूका घेतल्या जातील. या सर्व निवडणूकांमध्ये आपल्याला पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत मोठ यश मिळवायचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासून ताकदीने कामाला लागावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत जिथे जिथे जिंकाल तेथे विकास कामांसाठी शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिले.

प्रशासनातील झारीतला शुक्राचार्य शोधणार

भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर इ गव्हर्नन्स सेवेवर भर दिला जात आहे. प्रशासकीय कामासाठी शासकीय कार्यालयात घालावे लागणारे हेलपाटे बंद केले जाणार आहेत एक फाईल दहा टेबलवर जाण्याची प्रक्रिया रद्द करून ती दोनच टेबलवर गेली पाहिजे असा प्रयत्न आहे. फायलींचा प्रवास लांबून कामे अडवणारा झारीतला शुक्राचार्य कोण गव्हर्नरच्या माध्यमातून बाहेर येईल, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात भाजप सरकार आल्याने गतिशीलतेने काम करावे लागेल हा हेतू ठेवण्यात आला. नवीन माहिती सरकार आल्यानंतर सहा महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. आपण पहिल्यांदा शंभर दिवसांचा कार्यक्रम राबवला. राज्यातील बारा हजार शासकीय कार्यालय ऍक्टिव्हेट होतील. तेथील प्रलंबित कामे संपवण्याचा उद्देश राहिला. त्यामुळे प्रशासकीय कामे पूर्ण करण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली, या कालावधीत किती कामे करता आली हे प्रशासनाच्या लक्षात आले. आता 150 दिवसांचा विकसित कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. विकसित महाराष्ट्र 2047 चा आराखडा तयार केला जाईल, प्रशासनात अकाउंटिबिलिटी आली पाहिजे, या उद्देशाने 2029 पर्यंत आराखड्यात बाबत प्रत्येक वर्षी कोणती कामे करायची याबाबतचे उद्दिष्ट ठरवले आहे.

political-news-zilla-parishad-municipal-elections-in-september-october

घरबसल्या दाखले मिळणार

2035 मध्ये महाराष्ट्राला 75 वर्षे पूर्ण होत आहेत या पार्श्वभूमीवर गव्हर्नर सेवा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुठल्याही शासकीय कार्यालयात न जाता घरबसल्या व्हाट्सअप वरून सेवा मिळतील, असा राज्य सरकारचा मुख्य हेतू आहे. दीडशे दिवसांच्या कालावधीत प्रशासकीय सुधारणांवर भर देण्यात आला. फायली कोणत्या टेबलवर जातात. काही ठिकाणी फायद्यांची अडवणूक होते आता ही प्रक्रियाच रद्द केली जाणार असून केवळ दोन टेबलवरच फाईल गेली पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून आपले सरकार चालवले पाहिजे. सरकार कुठलेही येऊ दे, मात्र राज्य मागे गेले नसले पाहिजे, या पद्धतीने राज्यातील माहिती सरकारकडून काम करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.

मी पुन्हा येईन…

सांगलीतील मेळाव्यात आज घाईगडबडीने मार्गदर्शन करीत आहे. मी पुन्हा येईन… तेव्हा सविस्तर मार्गदर्शन करेन. मला पुन्हा येण्याची सवय आहे. त्यामुळे मी सांगलीला नक्की येईन. त्यावेळी सांगलीकरांना भरपूर वेळ देईन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणताच सभागृहात हशा पिकला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *