rajkiyalive

political news : लोकसभेपाठोपाठ आता विधानसभेच्याही रिंगणात

दिनेशकुमार ऐतवडे

political news : लोकसभेपाठोपाठ आता विधानसभेच्याही रिंगणात: विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता एकमेेकांसमोरील लढती फिक्स झाल्या आहेत. चार महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीततील दोन पराभूत उमेदवार आता विधानसभेसाठी नशीब आजमावित आहेत. तासगावमधून संजयकाका पाटील आणि पन्हाळा शाहूवाडीमधून सत्यजित पाटील सरूडकर यांचा त्यामध्ये समावेश आहे.

political news : लोकसभेपाठोपाठ आता विधानसभेच्याही रिंगणात

लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदार संघातून विरोध असतानाही भाजपने संजयकाका यांच्यावर विश्वास दाखविला. दोनवेळा खासदारकी भोगलेल्या संजयकाकांका विजयाची हॅटट्रीक करण्याची संधी होती. परंतु त्यांना ती साधता आली आही. पक्षांतर्गत तर विरोध होताच परंतु विलासराव जगताप आणि अजितराव घोरपडे या दोन माजी आमदारांनी उघडपणे बंड केले आणि संजयकाकांचा पराभव झाला. सांगली लोकसभा मतदार संघाअंतर्गत पाच विधानसभा मतदार संघात त्यांची पिछेहाट झाली.

त्यांचे होमग्राउंड असलेल्या तासगाव मतदार संघातही ते मागे पडले होते. तरीही ते आता विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. लोकसभेनंतर पुलाखालून बरेच पाणी गेले. संजयकांकांनी भाजपसोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घेतले. आणि ते आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या रोहित पाटील यांच्याशी दोन हात करीत आहेत. राज्यातील एक लक्षवेधी लढत म्हणून या लढतीकडे पाहिले जात आहे.
तासगाव तालुक्यातील चिंचणी आणि अंजनी या दोन गावातील लढत उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. आबा विरूध्द काका अशी ही लढत व्हायची आता.

आबांचे पूत्र रोहित पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यात ही लढत होत आहे. या अगोदरही संजयकाकांनी अनेकवेळा विधानसभा लढवली आहे. परंतु त्यांना त्यात यश आले आहे. यंदाच्या निवडणुकीत काय होते ते लवकरच कळेल.

लोकसभेला पराभूत झालेले दुसरे उमेदवार म्हणजे शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर. लोकसभेला हातकणंगले मतदार संघातून महाविकास आघाडीतर्फे ते रिंगणात होते. त्यांच्या विरोधात शिंदे सेनेचे धैर्यशील माने होते. सहा विधानसभा मतदार संघापैकी इस्लापूर, शिराळा आणि शाहूवाडी या मतदार संघात त्यांना लीड मिळाले तर इचलकरंजी, शिरोळ आणि हातकणंगलेमध्ये त्यांची पिछेहाट झाली. त्यांचे होम ग्राउंड असलेले पन्हाळा शाहूवाडीमध्ये त्यांना लीड मिळाले आहे. ही त्यांची जमेची बाजू आहे.

सत्यजित पाटील सरूडकर यांना एका निवडणुकीत विजय आणि एका निवडणुकीत पराभव असे चक्र सुरू आहे. गेल्या विधानसभेत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यंदाच्या निवडणुकीत काय होते तेही आता लवकरच कळेल.

पन्हाळ शाहूवाडी 2019 चा निकाल
जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांनी ही निवडणूक जिंकली. त्यांना 124868 मते मिळाली. त्यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे सत्यजित पाटील सरूडकर होते. त्यांना 97005 मते मिळाली.

तासगाव विधानसभा 2019 चा निकाल
2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुमन पाटील विरोधात शिवसेनेचे अजितराव घोरपडे यांच्यात मुख्य लढत झाली. सुमन पाटील 128371 मत. तर घोरपडेंना 65539 मते मिळाली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज