मिरज/ प्रतिनिधी
RATNAGIRI -NAGPUR HIGHWAY : भोसे जवळ विचित्र अपघात, दहा वर्षीय बालकाचा मृत्यू : रत्नागिरी -नागपूर महामार्गावर असलेल्या भोसे गावाजवळ ट्रॅक्टर आणि पिकअप जीप, मिनी टॅम्पोच्या यांच्यामध्ये झालेल्या विचित्र अपघातामध्ये दहा वर्षीय अमित जमन्नाथ पवार ( रा. सातारा गोपाळ वस्ती) मुलाचा मृत्यू झाला. मिनी टॅम्पोच्या जमावाने मोडतोड केली. घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलिस आणि राज्यमार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. काहीकाळ वाहनांची मोठी गर्दी झाली होती.
RATNAGIRI -NAGPUR HIGHWAY : भोसे जवळ विचित्र अपघात, दहा वर्षीय बालकाचा मृत्यू
याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूरहून मिरजेकडे (एम एस डी. बी. 689 ) या क्रमांकाचा ट्रॅक्टर येत होता. ट्रॅक्टरच्या पाठीमागून पॅगो रिक्षा ओव्हरटेक करून पुढे येत असताना पॅगो रिक्षाला (एम. एच. 6165) या मिनी टॅम्पोने जोराची धडक दिली. पॅगोरिक्षा पाठीमागील बाजूस बसलेला दहा वर्षीय अमित पवार हा उडून रस्त्यावर पडला. रस्त्यावर पडल्यावर त्याच्या अंगावरून मिनीटेम्पो गेला. यामध्ये अमित याचा जागीच मृत्यू झाला.
आपल्या मुलाचा आपल्या डोळ्यासमोर मृत्यू झाल्याचे पाहून आईने हंबरडा फोडला.
हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. काबाडकष्ट करून आपला प्रपंच चालविणार्या कुटूंबियावर काळाने घाला घातला. अमित हा सर्वांचा लाडका होता . घटनास्थळी प्रचंड झाल्याने जमावांनी मिनी टेम्पोवर दगडमारून काचा फोडल्या. घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलिस तसेच महामार्ग पोलिस दाखल झाले. जमाव हटविला व महामार्ग मोकळा केला. या अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली आहे.
पॅगोरिक्षात पाचजण होते. ते सर्वजण विटभट्टीवर काम करतात. विटभट्टीकडे जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्यावर काळाने घाला घातला. बाकीची किरकोळ जखमी झाले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



