rajkiyalive

sangli bailgada news : सांगलीवाडीत रंगणार जयंत बैलगाडा शर्यतीचा थरार

sangli bailgada news : सांगलीवाडीत रंगणार जयंत बैलगाडा शर्यतीचा थरार : महालक्ष्मी मंदिर यात्रा 2025 च्या निमित्ताने सांगलीवाडी येथे मंगळवार दि. 8 एप्रिलला दुपारी दोन वाजता विना लाठीकाठी, मोटारसायकल मानाची जयंत बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. प्रथम क्रमाकांच्या विजेत्यासाठी सव्वालाखाचे बक्षिस असून शर्यतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आ. जयंत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक अभिजीत कोळी यांनी दिली.

sangli bailgada news : सांगलीवाडीत रंगणार जयंत बैलगाडा शर्यतीचा थरार

पहिले बक्षीस सव्वालाख

सांगलीवाडीतील लक्ष्मी फाटाजवळील मिटारकी पट्टा येथे या शर्यती होणार आहेत. स्पर्धेत जनरल ‘अ’ गटासाठी अनुक्रमे पहिल्या क्रमांकासाठी एक लाख 25 हजार 25 रूपये शिल्ड व निशाण. दुसर्‍या क्रमांकासाठी एक लाख 25 रूपये शिल्ड व निशाण व तिसर्‍या क्रमांकासाठी 75 हजार 25 रूपये शिल्ड व निशाण अशी बक्षिसे आहेत. या गटासाठी प्रवेश फी 12 हजार 500 रूपये आहे. जनरल ‘ब’ गटातील पहिल्या क्रमांकासाठी 31 हजार 25 रूपये शिल्ड व निशाण दुसर्‍या क्रमांकासाठी 21 हजार 25 रूपये शिल्ड व निशाण तर तिसर्‍या क्रमांकासाठी 15 हजार 25 रूपये शिल्ड व निशाण अशी बक्षिसे आहेत. या गटासाठी तीन हजार प्रवेश फी आहे.

स्पर्धेत एक दुस्सा व एक जनरल घोडागाडी शर्यतीतील पहिल्या क्रमांकासाठी 21 हजार 25 रूपये शिल्ड व निशाण, दुसर्‍या क्रमांकासाठी 15 हजार 25 रूपये शिल्ड व निशाण तर तिसर्‍या क्रमांकासाठी 7 हजार 25 रूपये शिल्ड व निशाण अशी बक्षिसे आहेत. या गटासाठी प्रवेश फी 2100 रूपये आहे. स्पर्धेतील चौथ्या आदत गटातील पहिल्या क्रमांकासाठी 15 हजार 25 रूपये शिल्ड व निशाण, दुसर्‍या क्रमांकासाठी 11 हजार 25 रूपये शिल्ड व निशाण. तर तिसर्‍या क्रमांकासाठी 7 हजार 25 रूपये शिल्ड व निशाण अशी बक्षिसे आहेत. या गटासाठी दीड हजार रूपये प्रवेश फी आहे.

स्पर्धेवेळी पृथ्वीराज पाटील, संजय बजाज, देवराज पाटील, आनंदराव नलवडे, भालचंद्र पाटील, हरिदास पाटील, राहुल पवार, दिलीप पाटील, सचिन जगदाळे, विजय पाटील, पी. आर. पाटील, जी. के. पवार, वैभव पाटील, शशिकांत पाटील, शिवाजी शिंदे, महाबळेश्वर चौगुले, जयश्री पाटील, अपर्णा कदम, सचिन देशमुख, प्रकाश सुर्यवंशी, सुहास मोहिते, रामचंद्र कोळी, सच्चिनानंद कदम, अतुल आवळे आदी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेच्या संयोजनात प्रविण पाटील, नजिर शेख, शिवाजी शिंदे, अमोल पाटील, बापू सरगर, मास्टर बबलू यांचा सहभाग आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज