sangli bjp news : रावसाहेब पाटील करणार भाजपमध्ये प्रवेश : दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पाटील हे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार आहेत.
sangli bjp news : रावसाहेब पाटील करणार भाजपमध्ये प्रवेश
रावसाहेब पाटील यांनी दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. जैन सभेच्या माध्यमातून जैन समाजामध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असतो.
कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे ते अध्यक्ष आहेत. या संस्थेच्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात शाखा आहेत. रावसाहेब पाटील हे शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत. ते सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत आणि शिक्षण संस्थांच्या विविध समस्यांवर त्यांनी राज्यभर आवाज उठविला आहे.
Raosaheb Patil will join BJP
रावसाहेब पाटील यांना भाजपमध्ये खेचण्यात भाजप नेते यशस्वी झाले आहेत. मंगळवारी भाजपच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, प्रदेश उपाध्यक्ष संदीप भंडारी, भाजप जैन प्रकोष्ट पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख प्रशांत गोंडाजे यांची प्रमुख उपस्थितीत प्रवेश करणार आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.