sangli crime news : अंकली फाट्यावर भर रस्त्यात कारला लागली भीषण आग : जडीबूटी विकूनच पोट भरणार्या दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर. : सांगली : सांगली ते कोल्हापूर मार्गावरील अंकली फाट्याजवळ आज सायंकाळ ओमनी कार ने अचानक पेट घेतला. जडीबूटी विकूनच पोट भरणार्या दामप्त्याचे आज एका अपघाताने रोजीरोटीच हिरावून घेतली. रात्री आठच्या त्यांच्या चारचाकीला अचानक आग लागली आणि जडीबूटींसह संसारसाहित्य जळून खाक झाले. सांगलीसह जयसिंगपूर येथील अग्निशमन दलाच्या बंबानी आग नियंत्रणात आणली. तोवरच सारे काही जळून खाक झाले होते.
sangli crime news : अंकली फाट्यावर भर रस्त्यात कारला लागली भीषण आग : जडीबूटी विकूनच पोट भरणार्या दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर.
सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील येथील अंकली फाटा परिसरातील एका वडा सेंटरसमोर ही चारचाकी गाडी लावली जाते. ते दामपंत्य मुळचे उत्तरप्रदेशमधील रहिवासी आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते येथे आयुर्वेदिक औषधे विक्री करतात. त्याचठिकाणी सायंकाळी गाडी उभी करून स्वयंपाकासह निवसाचीही व्यवस्था तेथेच केली जाते.
आज रात्री आठच्या सुमारास या चारचाकीला अज्ञात कारणाने आग लागली. क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. याबाबतची माहिती सांगली-जयसिंगपूर अग्नीशमन दलास कळविण्यात आले. तातडीने दोन्ही गाड्या घटनास्थळी धावल्या. सांगलीची गाडी हद्द सोडून मदतीच्या भावाने भरधाव वेगाने धावत आली. हा सारा थरार तमाम सांगलीकरांनी पाहिला. जयसिंगपूरच्या अग्नीशमन दलाच्या बंबाने आग विझवण्याचे काम सुरू होतेच.
तेवढ्यात सांगलीचा बंबही काही मिनिटात दाखल झाला. क्षणात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. एका चारचाकी गाडीतच त्या कुटुंबाचे जेवण, निवास आणि व्यवसाय केला जातो. एवढ्या कडाक्याच्या थंडीत आता हे कुटुंब रस्त्यावर आले. त्यामुळे सार्यांना हळहळ व्यक्त केली जात होती. सांगली अग्नीशमन दलाचे प्रमुख सुनील माळी यांच्या नेतृत्वाखाली चालक उमेश सरवदे, फायरमन सुधीर मोहिते यांनी कामगिरी केली.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



