आदिती तटकडे यांच्याकडून माहिती
ladki bahin yojna : लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरु झाल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागून राहिलेली होती. आता लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. यासंदर्भातील माहिती आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली आहे.
ladki bahin yojna : लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात
महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम 7 मे रोजी देण्यात आली होती. त्यानंतर मे महिन्याची रक्कम कधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. अकराव्या हप्त्याच्या रकमेसह लाडक्या बहिणींना योजना सुरु झाल्यापासून 16500 रुपये मिळाले आहेत. काही महिन्यांमध्ये दोन महिन्यांची रक्कम लाडक्या बहिणींना एकत्रितपणे देण्यात आली होती. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची रक्कम एकत्रित देण्यात आली होती.
या महिलांना मिळतात केवळ 500 रुपये
लाडक्या बहिणींना सरकार योजनेनुसार 1500 रुपये देतं मात्र ज्या महिला शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेतात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 500 रुपयांची रक्कम दिली जाते. मे महिन्याच्या हप्त्यासह 11 हप्त्यांची रक्कम महिलांना मिळाली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











