rajkiyalive

sangli crime news : सांगलीत भर बाजारात दागिने हिसडा मारून केले लंपास

sangli crime news : सांगलीत भर बाजारात दागिने हिसडा मारून केले लंपास :  शहरातील हरभट रोडवरील टिळक चौकात भाजी खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या गळयातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केले. ही घटना शनिवारी रात्री पावणे आठच्या सुमारास घडली. चोरीनंतर चोरटे दुचाकीवरून सांगलीवाडीच्या दिशेने पसार झाले. भर रहदारीच्या ठिकाणी घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. याबाबत धनश्री विठ्ठल काळे (वय 44, रा. फौजदार गल्ली, खणभाग, सांगली) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली.

sangli crime news : सांगलीत भर बाजारात दागिने हिसडा मारून केले लंपास

सांगलीवाडीकडे चोरटे पळाले

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हरभट रोड, कापडपेठ परिसरात आज आठवडा बाजार होता. त्यात संततधार पाऊसही पडत होता. फिर्यादी काळे या सायंकाळी भाजी खरेदीसाठी बाजारात आल्या होत्या. हरभट रस्त्यावरील टिळक चौकात पाऊस आल्याने त्या रस्त्याकडेला दुकानाच्या समोर थांबल्या होत्या. यावेळी तोंडाला कापड बांधलेला चोरटा त्यांच्याशेजारी येऊन उभा राहिला. तर त्याचा साथीदार दुचाकी घेऊन रस्त्यावर थांबला होता.

sangli-crime-news-jewelry-looted-in-a-crowded-market-in-sangli

दुकान बंद होताच त्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचा दागिना हिसडा मारून दुचाकीवरून पळ काढला. काळे यांनी आरडाओरडा केला. पण चोरटे सांगलीवाडीच्या दिशेने भरधाव निघून गेले. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक महादेव पोवार हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चोरीची माहिती घेतली. टिळक चौक व सांगलीवाडी परिसरातील सीसीटीव्ही तपासणीचे काम पोलिसांनी सुरू केले. भरबाजारात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज