rajkiyalive

sangli crime news : कर्नाळ-नांद्रे मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक : अपघातात ब्रह्मणाळचा तरुण गंभीर जखमी.

sangli crime news : कर्नाळ-नांद्रे मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक : अपघातात ब्रह्मणाळचा तरुण गंभीर जखमी. : सांगली : कर्नाळ ते नांद्रे मार्गावरील अभिनंदन ढाबा येथे भरधाव दुचाकीने समोरून येणार्‍या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील अमरदीप नारायण लोटे (वय 35 रा. ब्रम्हनाळ) हा तरुण गंभीर जखमी झाला. सदरचा अपघात हा सोमवार दि. 16 डिसेंबर रोजी सकाळी पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी नारायण श्रीपती लोटे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दुचाकीस्वार अक्षय अविनाश साळुंखे (वय 28 रा. सांगली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

sangli crime news : कर्नाळ-नांद्रे मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक : अपघातात ब्रह्मणाळचा तरुण गंभीर जखमी.

याबाबत अधिक माहिती अशी कि, जखमी अमरदीप लोटे हे आपल्या कुटुंबियांसह पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ गावामध्ये राहतात. सोमवारी सकाळी लोटे हे त्यांची दुचाकी (क्र. एमएच 10 ईएफ 5802) वरून नांद्रे कडून सांगलीकडे येत होते. या मार्गावरील अभिनंदन धाब्यासमोर त्यांची दुचाकी आली असता समोरून भरधाव वेगात संशयित अक्षय साळुंखे हा त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र, एमएच 10 सीसी 4511) हि घेऊन येत या दुचाकीने लोटे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

या अपघातात लोटे हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमी लोटे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी नारायण लोटे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून दुचाकीस्वार अक्षय साळुंखे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज